अहमदनगर : माझ्या मोकळ्या जागेत असलेले पत्रे काढून घे असे म्हणल्याचा राग येवून चौघांनी एकास घरात घुसून मारहाण केली. यात सोमनाथ वाघमारे हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी चौघांविरूध्द कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सव्सितर असे की, फिर्यादी वाघमारे यांनी किरण वाघमारे यास माझ्या मोकळ्या जागेत टाकलेले पत्रे काढून टाका असे सांगितले.
याचा राग येवून किरण वाघमारे याने फिर्यादीस म्हणाला तु माझ्या वडीलांना त्रास देतो, आणि तूच मला सांगतो काय आमच्या जागेतून पत्रे काढू घे. असे म्हणत शिवीगाळ करून किरण आबासाहेब वाघमारे याच्यासह आबासाहेब सोपान वाघमारे, रेखा आबासाहेब वाघमारे, प्राजक्ता किरण वाघमारे (सर्व रा.खेड ता.कर्जत) यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमनाथ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.