अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-ग्रामीण भागााातील कोरोोनाची स्थिती नुकत्याच झालेेल्या निवडणूका आणि प्रभारी प्रशासकीय बाबींच्या पार्श्वभूमीवर राज्याातील ग्राामसभा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
दरम्यान नुकतेच ग्रामसेवक संघटनेच्या नेत्यांनी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती . त्यावर ना. मुश्रीफ यांनी ही घोषणा केली .
ग्रामीण भागात अद्यापही कोविडची परिस्थिती पूर्वपदावर नाही. तसेच राज्यातील सुमारे 14 हजार 500 ग्रामपंचायतींवर प्रशासक राज असून एका – एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे .
त्यामुळे एकाच वेळी या सर्व ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहणे शक्य नाही. याशिवाय ज्या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत.
तेथे अद्याप सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणे बाकी आहेत, अशा स्थितीत ग्रामसभा केवळ औपचारिकता ठरेल. आदि बाबी राज्य ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या.
व ग्रामसभांना मुदतवाढ देण्याची विनंती केली .त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून यावर ना. मुश्रीफ यांनी तात्काळ ग्रामसभा 31 मार्च पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय आज जाहीर केला.
त्यामुळे ग्रामसेवकांना दिलासा मिळाला आहे . आज सकाळपासून राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे ,राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे व राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम या मुंबईत ठाण मांडून होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved