धूम स्टाईलने अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-शहरातल्या नगर कल्याण रस्त्यालगतच्या जाधव पेट्रोल पंपामागे असलेल्या साई रुग्णालयाजवळीत विद्या कॉलनीत ऍड. गटणे पत्नीसह दुचाकीवरुन जात असता धूमस्टाईल आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातले दोन तोळ्याचे मंगळसूत्र तोडून नेले.

काळ्या रंगाच्या नवीन होंडा शाइन दुचाकीवरुन आलेल्या दुचाकी स्वरांनी गाडी चालकाने आकाशी रंगाचा चा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने भगव्या रंगाचा शर्ट आणि पांढरी पँट असा पोषाख परिधान केलेला आहे. दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेले असून कल्याण रोड ब्रिजच्या दिशेने ते पसार झाले.

अवघ्या मिनिटात ऍड. गटणे यांच्या पत्नीच्या गळ्यातले मंगळसूत्र धूमस्टाईल ओढून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे