अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास दमदार पाऊस झाला. गोंधवणी, शिरसगाव, बेलापूर परिसरात व शहरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.
श्रीरामपुरात आतापर्यंत ६२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी याकाळात फक्त १५१ मिलिमीटर पाऊस झाला होता. दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी सध्या समाधानी आहेत.

Rain drops falling from a black umbrella concept for bad weather, winter or protection
मात्र, सारखा पाऊस पडत राहिला, तर तो पिकांना मारक ठरणार आहे. नगर शहरातही बुधवारी रात्री पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
जिल्ह्याच्या अन्य भागातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे भूजल पातळीत चांगली वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर्षी मिटला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा