जिल्ह्यातील ऐतिहासिक तिर्थस्थानं हिंदू धर्माची बलस्थान – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

जिल्ह्यातील ऐतिहासिक तिर्थस्थानं हिंदू धर्माची बलस्थान आहेत. या तिर्थक्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सर्वांनाच स्विकारावी लागेल. हिंदू धर्म आणि संस्कृती समोरील आव्हानांच्या विरोधात कराव्या लागणाऱ्या सामुहीक संघर्षाकरीता पारंपारीक वारसा स्थळ आपल्याला विचारांची उर्जा देतील असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांनी जिर्णोध्दार केलेल्या शहरातील ऐतिहासिक मोठे मारूती मंदीराच्या सभा मंडपाच्या विस्तारीत कामाचा भूमीपूजन समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या सभा मंडपाच्या कामाकरीता जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून ३७ लाख रुपयांचा निधी विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे.

या निमित्‍ताने श्री.हनुमान मंदीर देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांचा सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने मानपत्र लक्ष्मीची मूर्ती देवून नागरी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठनेते अशोकराव सराफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मंदीर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, विनय गुणे, श्रीराम गणपुले, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहूल वाघ, गटविकास अधिकारी अनिल नागणे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याचा तिर्थक्षेत्रांचा विकास आराखडा तयार झाला आहे. या माध्यमातून मंदीर परीसराचा विकास करून या भागातील रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे काम होणार आहे.

श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीर देवस्थानाचा सर्वात मोठा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, ज्ञानेश्वरसृष्टी उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध होण्याकरीता प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहीती विखे पाटील यांनी दिली.

शिर्डी येथे येणा-या भाविकांसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीतून साईबाबांच्या जीवनावर थीम पार्क आणि लेझर शोची निर्मीती करण्यात येत असून त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. राज्य सरकारने याकरीता ४० कोटी रुपयांच्या निधीचा पहीला टप्पा मंजूर केला आहे.

अहील्यानगरची ओळख अध्यात्मिक नगरी म्हणून आहे. प्रत्येक तालुक्यात असलेले देवस्थान तिथल्या संस्कृती परंपरेचे वारसा स्थळ आहेत. संगमनेरचे मोठे मारूती देवस्थान ऐतिहासिक असून इथल्या रथोत्सवाला असलेली परंपरा जोपासण्याचे काम विश्वस्त समिती आणि नागरीकांनी केल्याचा अभिमान असून, ही तिर्थक्षेत्रच हिंदू धर्मासाठी बलस्थान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आज हिंदू धर्म आणि संस्कृती समोर मोठी आव्हान उभी राहात आहेत. धर्मावर होणारी आक्रमण थोपावयाची असतील तर सामुहीक संघर्षा शिवाय पर्याय नाही. यासाठी आशा वारसा स्थळांकडूनच आपल्याला उर्जा मिळेल असा विश्वास मंत्री विखे व्यक्त केला. राज्य सरकारच्या माध्यमातून तिर्थ क्षेत्रांच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. जेष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना सुरू केली असून जेष्ठ नागरीकांना तीस हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून तालुक्यातून अनेकांना आता तिर्थयात्रे करीता पाठविण्याची गरज निर्माण झाली आहे. वयाचा विचार करता अनेकजण योजनेत बसू शकतात असा टोला लगावून विकासाची प्रक्रीया ठेकेदाराचे हित पाहाणारी नसावी. राजकारणा पलिकडे जावून यासाठी विचार झाला पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

संघाचे जेष्ठ नेते अशोकराव सराफ यांनी मारूती मंदीराच्या ऐतिहासिक वाटचालीची माहीती देवून या देवस्थानाला ३७ कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले. जातीवरहीत समाज रचना निर्माण करण्याचे काम करताना हिंदू धर्म म्हणून एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहाता येणा-या काळात हिंदू धर्मातील प्रत्येकाने जागृत होवून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी केले तर सूत्रसंचलन आणि मानपत्राचे वाचन सौ.स्मिता गुणे यांनी केले.

या कार्यक्रमास जेष्ठ स्वयंसेवक उतमराव करपे, सुभाष कोथमिरे, दिलीप शिंदे, किशोर कालडा, अमोल खताळ, वैभव लांडगे, शरद गोर्डे, कैलास वाकचौरे, सोमनाथ कानकाटे, ज्ञानेश्वर करपे, शिरीष मुळे, बजरंग दलाचे कुलदिप ठाकूर, जावेद जहागिरदार, अतुल कासट, ज्ञानेश्वर थोरात, योगीराज परदेशी, वरद बागुल, दिनेश फटांगरे यांच्यासह शहर आणि तालुक्यातील सर्व संघटना व संस्थाचे पदाधिकरी, कार्यकर्ते, महीला उपस्थित होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe