अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारला होता. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माळीवाड्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार करून काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, डॉ.रिजवान शेख, डॉ.दिलीप बागल, सय्यद खलील, नलिनीताई गायकवाड, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष राजू भाई शेख, युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष अक्षय कुलट आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काळे यावेळी बोलताना म्हणाले की, समाजाला प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. त्यांनी त्यावेळी केलेले काम हे आजही तितकेच प्रेरणादायी आहे. महात्मा फुले हे क्रांतीसुर्य म्हणून जनसामान्यांच्या मनामध्ये आहेत. त्यांचा विचार हा समाजातील तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच काम कायमच काँग्रेस पक्षाने केल आहे.
ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने या देशाला शिक्षण मिळविण्याचा हक्क मिळवून दिला. त्यासाठी त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले.
पण यातूनच शिक्षित भारताची निर्मिती झाली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या विचारांची शिदोरी ही युवकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवली पाहिजे. आजचा नवतरुण यांना त्यांच्या विचारांची ओळख व्हावी यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही निश्चित पण प्रयत्न करणार आहोत.
यावेळी विशाल कळमकर, प्रवीण गीते, प्रमोद अबुज, अमित भांड, अन्वर सय्यद, मुबिन शेख, यश भोंगे, जाहिद अखतार, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, महेश लोंढे, संकेत लोकरे, मयुर सोनवणे, केतन खरपुडे, सागर बोराडे, गोपाल नायडू, आदित्य यादव, मनोज उंदरे, निसार बागवान राजू कुलकर्णी सौरभ रणदिवे, करण शेलार, मयूर सोनवणे, आदित्य यादव, महेश लोंढे, अमित मोमीन, अभिजीत कुलकर्णी आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved