अहिल्यानगर व श्रीगोंदयामध्ये महाविकास आघाडीत बंडाचे निशाण कायम! शशिकांत गाडे यांनी उमेदवारी ठेवली कायम

श्रीगोंदा तून राहुल जगताप यांनी अर्ज माघार न घेता अपक्ष उमेदवारी कायम ठेवली व अहिल्यानगर मतदारसंघांमध्ये देखील शेवटच्या क्षणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अखेरच्या क्षणी निर्णय बदलत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कालचा दिवस हा खूप महत्त्वाचा होता व काल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून बंडखोरांना थंड करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले व शेवटच्या क्षणी काही ठिकाणी बंडखोरांची समजूत काढण्यास महाविकास आघाडी आणि महायुतीला यश आले तर काही ठिकाणी अपयश आल्याचे चित्र आहे.

या अनुषंगाने बंडखोरांमुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचे मात्र टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित आहे. अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर व श्रीगोंदा मतदारसंघात दिसून आली व या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्यात सपशेल अपयश आले आहे.

या ठिकाणी जर आपण बघितले तर श्रीगोंदा तून राहुल जगताप यांनी अर्ज माघार न घेता अपक्ष उमेदवारी कायम ठेवली व अहिल्यानगर मतदारसंघांमध्ये देखील शेवटच्या क्षणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अखेरच्या क्षणी निर्णय बदलत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

अहिल्यानगर व श्रीगोंदयामध्ये महाविकास आघाडीत बंड
अहिल्यानगर व श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्यामध्ये सपशेल अपयश आले असून श्रीगोंदा मधून राहुल जगताप यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी कायम ठेवली व अहिल्यानगर मतदारसंघांमध्ये शेवटच्या क्षणी निर्णय बदलत शशिकांत गाडे यांनी देखील उमेदवारी कायम ठेवली.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांना उमेदवारी निश्चित मानले जात होती. परंतु ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आली व त्या ठिकाणी अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,

भगवान फुलसौंदर आणि बाळासाहेब बोराटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. सोमवारी नक्षत्र लॉन या ठिकाणी महाविकास आघाडीचे बैठक झाली व त्यामध्ये अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा व इतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार अडीच वाजता शिवसेनेचे तीनही बंडखोर उमेदवार निवडणूक अधिकारी कार्यालयात आले होते
तेव्हा बोराटे व भगवान फुलसौंदर यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.मात्र जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी ऐनवेळी निर्णय बदलला व आपली उमेदवारी कायम ठेवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe