अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.
अशाच शहरातील एका रस्त्यावर एक अपघात झाला होता. दरम्यान अपघाताची माहिती समजताच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
शहरातील माळीवाडा एसटी स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा अपघात घडला होता. आमदार जगतापांनी सर्वप्रथम अपघातातील जखमींना मदत केली.
त्यांना उपचारास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. एवढे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी रस्त्याची पाहणी केली त्यांनतर जगताप यांनी मध्यरात्री सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना बोलवून घेतले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजगुरू आणि गायकवाड हे घटनास्थळी पोहचले. या सरकारी अधिकाऱ्यांनी आमदार जगतापांसमवेत रस्त्याची पाहणी केली.
तसेच नगर-पुणे रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविणे, दुभाजकांची दुरूस्ती करणे, रिफ्लेक्टर बसविणे, पावसाळी नाल्यांची साफसफाई करणे आदी सूचना जगतापांनी यावेळी दिल्या. आमदारांच्या या सूचनेनंतर नगर-पुणे रस्त्यावर रात्रीच खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved