अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-आमदारकीचा हव्यास असलेला पुढारी मी नसून खासदार व्हायचे माझ्या डोक्यात नाही, हे स्पष्ट करत सर्वसामान्य जनतेची सेवा, लोकांच्या सुखदुःखात सहभाग एवढेच माझे सामाजिक भांडवल असल्याने ज्या ठिकाणी थांबलो तेथे जनता जनार्दनाची गर्दी होऊन सभेत रूपांतर होते, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
राहुरी तालुक्यातील मांजरी येथे लंके प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार लंके यांचे मांजरी गावात आगमन होताच उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजी व ढोल, ताशांच्या गजराज स्वागत करण्यात आले. लंके म्हणाले, आमदार झाल्याचे मला कधीही वाटत नाही.
सत्तेची हवा डोक्यात गेली की, लोकप्रतिनिधीचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे समजावे हा टोला सत्तेची गुर्मी असलेल्या पुढाऱ्यांना लगावला. प्रतिष्ठान काढणे सोपे मात्र टिकवून ठेवणे अवघड आहे. सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी प्रतिष्ठानचा वापर आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
खासदारकी माझ्या डोक्यात नसून जनतेने आपला माणूस म्हणून दिलेले पद हाच माझ्यासाठी मोठा बोनस आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved