अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कर्जत तालुक्यातील गणेशवाडी, गावच्या शिवारात भीमा नदी पात्रात भरत बलभीम अमनर, दत्तत्रे विक्रम खताळ, अंकुश बाप्पू ठोंबरे हे तांत्रिक बोटीच्या साह्याने चोरून वाळू उपसा करत आहेत.
अशी माहिती कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारा मार्फत समजली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा मारला.
यावेळी भीमा नदी पात्रात तीन यांत्रिक बोटीच्या साह्याने वाळू उपसा करताना मिळून आल्या. सदर बोटी ताब्यात घेऊन त्यावरील दोन लोकांना ताब्यात घेण्यात आले.
यामध्ये लहू बबलू शेख, (रा. पिअरपूर, झारखंड), शौकत बच्चू शेख, (रा. पळसगच्ची, झारखंड) असे सांगितले. सदर बोटींच्या मालका बाबत विचारपूस केली असता.
त्यांनी त्याचे नाव भरत बलभीम अमनर, (रा. वाटलुज, ता. दौंड, जिल्हा पुणे), शरद शेंडगे (रा.वाटलुज, तालुका दौंड, जिल्हा पुणे), दत्तात्रय विक्रम खताळ (रा. गणेशवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर) व अंकुश ठोंबरे (रा. गणेशवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर) असे सांगितले.
सदर आरोपी वर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 15,00,000/- किमती 43 यांत्रिक लोखंडी फायबर बोटी व 9,00,000/- रुपये किमतीच्या तीन सेक्शन बोट असा एकूण 24,00,000 रु चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम