नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस् ‘ ला राष्ट्रीय कृषी पुरस्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-भिंगार येथील महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘ नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस् ‘ या मशरूम उत्पादनाला राष्ट्रीय कृषी युवा 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक येथे झालेल्या विशेष समारंभात नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस् च्या अध्यक्षा अपूर्वा तोरडमल आणि प्रा. सुहास तोरडमल यांना सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संतोष मंडेल चा, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोकजी दवण, कृषी भूषण पुरस्कार विजेते भूषण निकम, अमित मखरे आदी उपस्थित होते.

अपूर्वा तोरडमल यांनी औरंगाबाद येथे बी. टेक (कृषी अभयांत्रिकी) ही पदवी घेतली. या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी चा निर्णय घेतले.

त्यासाठी खाजगी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली. भिंगार परिसरातील महिलांना संघटीत करून मशरूम उत्पादनाचे मार्गदर्शन केले. मशरूम पासून उपपदार्थ तयार करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

मशरूम पापड, कुरडई, शेवया, बिस्कीट तयार करून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment