आता डायरेक्ट ऑपरेशन करू मंत्री तनपुरे यांची कर्डिले यांच्यावर टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-मागील २० ते २५ वर्षांत काय झाले, याकडे आपण लक्ष देत नाही. आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे. वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळेच विविध राजकीय पक्ष, संघटना उदयास येत आहेत. मात्र समोरच्याचे मत ऐकून घेवून त्याचा आदर करण्यासाठी मोठे मन लागते. परंतु जो माझा नाही.

त्याला कसेही करून चिरडून टाकण्याची जी विकृत्ती आहे, ती येथून पुढे चालणार नाही. ज्यांची घरे काचेची आहेत, त्यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नये. कामे करताना राजकारण करावे पण ते विकासाच्या मुद्द्यावर करावे. एखाद्याचा संसार उघडा पाडण्यासाठी करू नये.

अन्यथा ओपीडीत उपचार नाही, तर डायरेक्ट ऑपरेशन केले जाईल, असा इशारा नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचे नाव न घेता दिला. नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्रजाक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाट व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

तनपुरे म्हणाले, कुणाला किती त्रास झाला आहे, हे नगर तालुक्याने पाहिले आहे. त्यांनी त्रास दिल्यानेच ते आता आजी नाही, तर माजी आहोत, याचे भान त्यांनी ठेवावे. जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. त्यामुळे नगर तालुक्यासाठी चांगला पर्याय उभा करणार आहोत.

जिल्हा बँक अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे खरी काय परिस्थिती आहे, हे जनता ओळखून आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवरही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल, असा दावाही त्यांनी केला. राहुरी-नगर मतदारसंघासह जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

उद्धव दुसुंगे म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून आजी आमदारांना माजी करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र ते दादागिरी मुळे माजी होतच नव्हते. आता मात्र ते माजी झाले आहेत. त्यामुळे दात पडलेल्या वाघाला घाबरण्याचे काही कारण नाही, असा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment