संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३२ वर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  : संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २३२ वर गेला आहे. रविवारी रात्री उशिरा १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सोमवारी सकाळी तालुक्यातील कासारवाडी येथील ६३ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा १४ झाला आहे.

रविवारी रात्री उशिरा शहरातील भारतनगर (४०, पुरुष), मालदाड रोड (५३, महिला व ५१, पुरुष), जनतानगर (२४, पुरुष), रहेमतनगर (३८, पुरुष), अरगडेगल्ली (४१, पुरुष), विजयनगर (६६, महिला), तर तालुक्यातील धांदरफळ

(३५, पुरुष) व निमोण (५६, पुरुष) आदी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गमनेर शहरात (९४, मृत्यू ८), तर तालुक्यातील धांदरफळ (९, मृत्यू १), निमोण (१६, मृत्यू २),

घुलेवाडी (८), डिग्रस (३, मृत्यू १), शेडगाव (३, मृत्यू १), पळसखेडे (३), गुंजाळवाडी (७), कुरण (४९), पेमरेवाडी (२), कासार दुमाला (३), संगमनेर खुर्द (२), ढोलवाडी (५),

खांडगाव (३), पिंपळगाव कोंझिरा (३), कनोली (४), नान्नज (२) तर केळेवाडी-बोटा, निंभाळे, आश्वी बुद्रूक, कौठे कमळेश्वर, जोर्वे, खळी, पिंपरणे, साकूर, निमगाव जाळी,

हिवरगाव पठार, पेमगिरी, नांदूर खंदरमाळ, हिवरगाव पावसा, मिर्झापूर, करुले, चिखली (प्रत्येकी १) अशा २३२ रुग्णांची नोंद तालुक्यात झाली आहे.

यातील २१९ मूळ रहिवासी, १६ जिल्ह्याबाहेरील आहेत. १३९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८० आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment