नागवडे साखर कारखान्याच्या प्रारूप यादीवर हरकतीचा पाऊस ; ३ फेब्रुवारीला सुनावणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागवडे सहकारी साखर कारखान्याने  २२ हजार ७११ सभासदांपैकी केवळ ९ हजार ५८९ सभासदांची यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक  ( साखर) अहमदनगर यांना पाठविली होती.११९७ मयत आणि १०५४ थकबाकीदार असे २२५१ वगळता २० हजार ४६० सभासद मतदार यादीत यावयास हवे होते.

पैकी ९ हजार ५८९ सभासद मतदार यादीत घेतले आणि १० हजार ८७१ सभासद मतदार यादीतून वगळले. त्यामुळे नागवडे साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून आला. सभासद जागृती करण्याची मोहीम  कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, घन:शाम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, जिजाबापू शिंदे, अॅड. बाळासाहेब काकडे व कैलास पाचपुते यांनी हाती घेऊन डावललेल्या  सभासदांचा मेळावा घेतला .

पुणे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याने आणि नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील साखर कारखान्याने सर्व सभासदांना प्रारूप यादीत घेतल्याने नागवडे कारखान्याच्या अडचणी वाढल्या होत्या. तशात भवानीनगर साखर कारखान्याचे २४ हजार ६९९ सभासद मतदार यादीत आल्याने, नागवडे कारखाना सभादांच्या डोळ्यावर आला.

दरम्यान २३ जानेवारीच्या मेळाव्यात प्रा. तुकाराम दरेकर यांनी जाहीर केलेकी, नागवडे कारखान्याने न्यायालयात जाण्याची चुकीची भाषा करण्याऐवजी २६ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत मयत आणि कारखाना उचल घेऊन थकबाकीत असणारे सोडून बाकीच्या २० हजार ४६० सभासदांना मतदार यादीत घेण्याचा ठराव कारावा.

एवढेच नाही तर अशा आशयाचा ठराव करण्याची विनंती प्रा. दरेकर यांनी कारखान्याच्या चेअरमनला पत्र देऊन केली होती. त्या प्रमाणे २६ जानेवारी २०२० च्या संचालक मंडळाच्या ठराव नंबर ९ ने तशा आशयाचा ठराव केल्याने अक्रियाशील ठरविलेल्या ११ हजार ९२५ सभासदांचा मार्ग सुकर झाला आहे.

२७ जानेवारी २०२० पर्यंत हरकतीची मुदत होती. सुमारे २ हजार हरकती आणि आक्षेप दाखल झाले.दरम्यान श्री. राजेंद्र नागवडे यांनी आपल्या सोसायटी मतदार संघात ४३ पैकी १० सोसायट्या मतदार यादीत घेऊन ३३ सोसायट्या डावलून आपला मतदार संघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यक्तीगत सभासदांच्या भाग भांडवल पुर्ततेला  एक वर्षाची मुदतवाढ दिली, पांच वर्षे उस न घालणाऱ्या पात्र ठरविण्याचा ठराव केला व वार्षिक सभेत अनुपस्थितीला क्षमापन दिले . ३३ सोसायट्यांना वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचे क्षमापन न देता त्यांना वंचित ठेवले. त्या बाबत संचालक मंडळाच्या सभेत कोणताही ठराव केला नाही.

त्यामुळे ३३ सोसायट्यांची ३३ गावे विरोधात जाऊ शकतात. सोसायट्या मतदार करण्यासाठी प्रसंगी आम्ही उच्च  न्यायालयात धाव घेऊ असेही प्रा. दरेकर म्हणाले.हरकती  दाखल  करण्यासाठी केशव मगर, घन;शाम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर , अॅड. बाळासाहेब काकडे, दिपक भोसले, कैलास पाचपुते, जिजाबापू शिंदे ,   अॅड. विठ्ठलराव  काकडे  हे हजर होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment