Ahilyanagar News: शेतीला 24 तास आणि दिवसा वीजपुरवठा होणे खूप गरजेचे असते. सध्याची जर आपण शेती पिकांचे किंवा शेतीची स्थिती बघितली तर विजेचा लपंडाव आणि रात्रीच्या वेळी होणारा वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते.
विजेच्या लपंडावामुळे तर विहिरींमध्ये पाणी असून देखील पिकांना पाणी देता येत नाही व बऱ्याचदा त्यामुळे पिकांना फटका बसतो व पिके करपतात. तसेच दिवसा वीज पुरवठा न होता रात्रीच्या वेळेस होत असल्यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते व यावेळी साप किंवा इतर वन्य प्राण्यांकडून देखील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका संभवतो.
त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे. सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर पॅनल्स आणि शेतीसाठी सौर कृषी पंप बसवण्यासाठी अनुदान देण्यात येते.
शेतामध्ये सौर कृषी पंप बसवल्याने शेतकऱ्यांना दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होईल व वेळोवेळी विजेच्या लपंडावाचा जो काही त्रास होतो तो देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतीच्या शाश्वत सिंचनासाठी दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषी पंप असा संपूर्ण सेट शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांकडून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला उत्तम असा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून जमिनीचे क्षेत्र किती आहे त्यानुसार तीन हॉर्स पावर ते साडेसात एचपी पर्यंतचे पंप या माध्यमातून मंजूर केले जातात.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे फायद्याची
शेतीला शाश्वत सिंचनाची सोय व्हावी याकरिता फक्त दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार असून या योजनेला खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळताना दिसून येत आहे.
या योजनेमध्ये तीन एचपी पासून ते साडेसात एचपी पर्यंतचे पंप मंजूर केले जातात व हे पंप मंजूर करताना जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे? या गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला जातो.
महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून रोजी अर्थसंकल्प सादर केला होता व या अर्थसंकल्पामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली. त्यानुसार आता शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण सेट मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष काय आहेत?
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही निकष निश्चित करण्यात आलेले आहेत व ते निकष म्हणजे….
1- पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
2- अति दुर्गम भागातील शेतकरी
3- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी, विहीर तसेच बोरवेल यांचे शेजारील शेतजमिनी धारक शेतकरी या योजनेस पात्र असणार आहेत.
कुठे करता येईल अर्ज?
तुम्हाला देखील शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतात कृषी पंप आणि सौर ऊर्जा निर्मिती सेट मिळवायचा असेल तर त्याकरिता महावितरणच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना वेबसाईटवर जाऊन लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करता येणार आहे.