अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-नगर तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करून दोन लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अनिल टिल्लू पवार (रा. नेप्ती ता. नगर), कुमार दादासाहेब फलके (रा. निमगाव वाघा ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना निमगाव वाघा व नेप्ती शिवारात गावठी हातभट्टी दारू निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून निरीक्षक सानप यांनी आपल्या पथकासह निमगाव वाघा येथे हातभट्टीवर छापा टाकून एक लाख 32 हजार रूपये किंमतीचे दोन हजार 200 लीटर कच्चे रसायन जप्त केले.
तर नेप्ती शिवारात पवार वस्तीवर छापा टाकून दोन हजार 100 लीटर रसायन, 100 लीटर दारू असा एक लाख 36 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved