25 हजारांची लाच घेताना पोलिसास रंगेहात पकडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शेवगाव पोलीस ठाण्यामधील पोलीस कॉन्स्टेबलला 25 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

353 च्या गुन्ह्याच्या जामिनासाठी कोर्टात से रोपोर्ट पाठविण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी साहेबांना सांगतो असे म्हणून आरोपीच्या वडिलांकडून तो २५ हजारांची लाच स्वीकारत होता.

सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक, निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक, हरीश खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम पवरे,

पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. अहमदनगर यांच्या पथकाने काल (शुक्रवार) ही कारवाई केली. शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल

भादवि 353 गुन्ह्यात मुलाच्या जामिनासाठी कोर्टात से रिपोर्ट पाठविण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी साहेबाना सांगतो असे म्हणून,

त्याच्या मोबदल्यात साहेबांसाठी म्हणून 24/07/2020 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान पंचा समक्ष 25 हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

काल आरोपी सोमनाथ आसाराम सोनटक्के (वय 32, पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 2568, नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन,

रा. डॉ. बटुळे यांच्या घरात (भाड्याने), खंडोबानगर, अखेगाव रोड, शेवगाव) यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe