रस्तालुटी नंतर अवघ्या 2 तासातच पोलिसांनी आरोपींना गजाआड केले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- नगर- औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी फाटा परीसरातील सुडके महाराज आश्रम जवळ सत्तर हजाराची रस्तालूट करुन पळालेले आरोपी शनिशिंगणापूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री नेवासाफाटा येथून चांदा गावी मोटारसायकल वरुन जात असताना रविंद्र राजेंद्र कदम यांना अडवून गावठी कट्टयाचा धाक दाखवत दोन तोळे सोन्याची चेन,

रोख साडे तेरा हजार रुपये व पंधरा हजाराचा मोबाईल हिसकावून नेला होता.आरोपींनी कदम यांना मारहाण केली होती. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्या सूचनेनुसार शनिशिंगणापूर पोलिस पथकाने नितीन मोहन राशिनकर व वैभव बाबासाहेब घोडके दोघेही राहणार कारेगाव (ता. नेवासा) या दोघास पाठलाग करुन अटक केली.

तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अटक केलेल्या राशिनकर वर पाच ते सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News