पोलिसांनी तारले गुन्हेगार ‘जिज्या’च्या कुटुंबाला; ते पाहून ‘जिज्या’ वाल्याचा वाल्मिकी झाला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- पोलीस प्रशासन आपली कर्तव्य तत्परता योग्य पद्धतीने निभावते यामुळेच आपण सर्वजण सुखरूप आहोत. कोरोनाच्या काळामध्ये याची प्रचिती सर्वानीच घेतलेली आहे. परंतु नेवासा गावात खाकीचे एक वेगळेच दर्शन घडले आहे.

येथे पोलिसांनी आरोपीच्या बाबतीत जे केले ते पाहून आरोपीही गहिवरला आणि वाल्याचा वाल्मिकी होत चांगल्या मार्गावर आला. त्याचे झाले असे, शहरातील गंगानगर परिसरातील जिजाराम उर्फ जिज्या नावाच्या व्यक्तीवर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्मचारी पोलीस नाईक सुनिल शिरसाठ, कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे, कॉन्स्टेबल अरुण शेकडे, कॉन्स्टेबल संदीप दरदंले हे सर्व पथक गावांत घडलेल्या एका दुकान फुटीच्या तपासात आरोपी जिजाराम याला अटक करण्यासाठी घरी गेले असता त्यांनी आरोपीच्या घरची बिकट परिस्थिती बघितली.

तसेच कुटुंबात पत्नी व सहा मुली असल्याचे बघितले. एका वेळच्या जेवणाला देखील महागलेलं कुटूंब बघून दगडाला पाझर फुटावा अशी विदारक परिस्थिती असल्याने पोलिसांच्या खमक्या वर्दीला चोरांचा हळवा स्पर्श निर्माण झाला आणि पोलिसांनी आरोपीच्या मुलींच्या लग्नाचा सगळा खर्च उचलण्याचे ठरविले आणि बघता बघता मुलींच्या लग्नात कोणी भाऊ,

कोणी मामा तर कोणी चुलत्यांची भूमिका पार पाडली. तसेंच किराणा, धान्य, नवरदेव नवरीचें कपडे, मंडप, तर काहींनी रोख स्वरूपात मदत केली व जगासमोर आदर्शवत असे काम नेवासा पोलिसांनी केले. मला वाईट मार्गावरून चांगल्या प्रवाहात

आणणार्‍या सर्व पोलिसांचा मी आभारी आहे. पुढील जीवनात मी नेहमी सरळ मार्गाने आयुष्य जगेल. अशी प्रतिक्रिया जिज्याने दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment