‘या’ तालुक्यात केली काळविटासह मोराची हत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : वन्यजीवांची शिकार करण्यास बंदी असतांहि श्रीगोंदा तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या ताब्यात असलेल्या देऊळगाव येथील वनक्षेत्रात एक काळवीट आणि एक मोराची हत्या करून मटण शिजवून खाल्ल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी गावातील दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या ताब्यात असलेल्या देऊळगाव येथील वनक्षेत्रात अनेक वन्यजीवांचा वावर आहे.

यात एक काळवीट आणि एक मोराची हत्या करून मटण शिजवून खाल्ले असल्याचा प्रकार घडला आहे. शिकार केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात असून उद्या न्यायालयात हजर करणार असल्याची अधिकृत माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांनी दिली.

तालुक्यातील देऊळगावमध्ये एक पक्षी आणि एक प्राणी याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन कर्मचाऱ्याने दोन जणांना ताब्यात घेतले.

या गावात वनक्षेत्र असल्याने या जंगलात वन्य प्राणी, पक्षी यांच्यासह अन्य वन्य जीवांचा वावर आहे. गावात काही घरांमध्ये वन्य पक्षी आणि वन्य प्राणी यांचे अवयव असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्याने त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी गावात दाखल झाले होते.

त्यांनी एक घरातून मटण ताब्यात घेतले असून, या मटणाच्या नमुन्याची तपासणी होणार असल्याची माहिती वनपाल हौसराव गारुडकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment