मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयाचे महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत मराठी भाषा समृध्द करण्यासाठी योगदान देणार्या प्रत्येकासाठी आजचा निर्णय अभिमानाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली
केंद्रीय मंत्री मंडळाच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मराठी भाषा समृध्द करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी आज अभिमनाचा क्षण असल्याची भावना व्यक्त करून राज्य सरकारने यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.जेष्ठ साहीत्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने यासाठी आपला अहवाल सादर केला होता.सर्वाच्या प्रयत्नाना यश आल्याचे त्यांनी सांगितले.