अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
यातच अद्यापही काही ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. नुकतेच पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्राचार्य विठ्ठल मरकड यांनी ग्रामस्थांच्या आवाहनानुसार घेतला.
करंजी येथील विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शिक्षकांसह शाळेत येणारे विद्यार्थी व पालकांमध्ये अस्वस्थता पसरली. यावेळी ग्रामस्थांनी तातडीने प्राचार्यांची भेट घेतली. विद्यालयातील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी १७ कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
त्यामुळे उर्वरित लोकांचे रिपोर्ट येईपर्यंत आपण पुढील काही दिवस शाळा बंद ठेवावी. असे आवाहन ग्रामस्थांनी प्राचार्यांकडे केले. विद्यालयाचे प्रा. मरकड यांनी सकारात्मक भूमिका घेत ग्रामस्थांनी केलेल्या
आवाहनाला प्रतिसाद पुढील पाच दिवस विद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर संस्थेच्या वरिष्ठांशी व शिक्षण विभागाचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेणार, असे प्राचार्य मरकड यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved