शिवाजी कर्डिले म्हणतात महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर ….

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाविकास आघाडी ही जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी नाहीतर फक्त निवडणूकीसाठी व माझ्यावर टिका करण्यासाठी झाली आहे.

राज्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता असताना नगरमध्ये किती विकासकामे केले ते आधी दाखवावे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या काळात यांनी नगर तालुक्यामध्ये विकासासाठी काय दिवे लावले ते आधी सांगावे.

साकळाई योजनेला मंजूरी नाही, पाणी नाही आणि जलसमाधीही नाही. खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकता येत नाही तर विकास कामे करून निवडणूका जिंकता येतात.

गेली तीस वर्ष नगर तालुक्­यातील जनतेचा विकास कामातून विश्वास संपादन केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ४५ ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

कर्डिले म्हणाले की, पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. सरपंच पदापासून ते मंत्रीपदापर्यंत जाण्याची संधी तालुक्­यातील जनतेने मला दिली आहे.

जिल्हा बँकेची ओळख ही कारखानदाऱ्याची बँक म्हणून ओळखली जायची मात्र आता शेतकऱ्याची बॅक म्हणून ओळखली जावू लागली. नवनिर्वाचित सदस्यांनी पदाचा उपयोग गावासाठी व गावाच्या विकासासाठी करावा.

निवडून आल्यानंतर डोक्यात हवा जावून देऊ नका व विकास कामांना प्राधान्यक्रम देऊन वार्डाचा विकास प्रत्येक सदस्यांनी करावा. जनता ही विकास करणाऱ्या माणसाबरोबर राहते, असे ते म्हणाले.

घिगे म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायतमध्ये निवडूण आलेल्या गावाची व सदस्यांची नावे जाहिर करावे. खोटी माहिती देऊ नये.