अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातल्या बाबुर्डी शिर्के येथे राहणारा तरुण शरद लक्ष्मण शिर्के याच्याबरोबर लग्न करुन त्याची पत्नी सौ. वैष्णवी हिने लग्नाच्या आधीपासून संदेश नंदकिशोर शिंदे,
{रा. भाईटेवाडी, तरडोली } याच्याशी असलेले प्रेमसंबंध या तरुणापासून लपवून ठेवले. संदेश आणि वैष्णवी या प्रियकर आणि प्रेयसी यांनी लग्नात मिळणारे
दागिने घेवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने शरद शिर्के याच्याशी दि. २५ जून २०२० रोजी वैष्णवीचे लग्न लावून दिले. या लग्नात मिळणारे १ लाख ५८ हजार ६६६ रुपये किंमतीच्या दागिन्यांसाठी फसवणूक केली.
दरम्यान, वैष्णवी आणि संदेश या दोघांनी मिळून आळंदी येथे अविवाहित असल्याचे भासवून वैदिक पद्धतीने विवाह केला आणि शरदची फसवणूक केली केली.
त्याची समाजात प्रतिष्ठा मलीन केली. दि. २५ जून २०२० ते १७ जुलै २०२० यादरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी शरद शिर्के या तरुणाच्या फिर्यादीनुसार आरोपी वैष्णवी संदेश शिंदे,
संदेश नंदकिशोर शिंदे {रा. तरडोली, मोरगाव, ता. बारामती} या दोघांविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ४९४, ४९५, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा