अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- भंगाराचे दुकानात घुसून मागील भांडणाचे कारण काढत दुकान मालकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.
तसेच दुकानाच्या नोकरासह अन्य तिघांनाही मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील धनगर वस्ती, येथे अब्दुलगणी शहा यांच्या मालकीचे खुशी एंटरप्राइजेस नावाचे भंगाराचे दुकान आहे.
त्या दुकानात शहा यांचे जावई नासिर सय्यद हे काम करत असताना सुलतान शेरअली शेख हा बेकायदेशीरपणे दुकानात घुसला. त्याने मागील भांडणाच्या कारणावरून नासिर यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नासिर यांनी सुलतानच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेतल्यानंतर सुलतान याने त्या दुकानात काम करणारा पंकज गिल या कामगाराला मारहाण केली. तसेच तेथे काम करणारे दाऊद शेख, दत्तू अनारसे, इमरान शेख यांनाही सुलतान याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर आरोपी सुलतान शेरअली शेख याने खुशी एंटरप्राइजेस या दुकानातील टिपाड, गॅस टाकी, भंगारचा माल बाहेर फेकून दिला.
तसेच दुकानाच्या बाहेर उभा असलेला आईशर टेम्पोवर दगडफेक करून टेम्पोचे नुकसान केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुलतान शेरअली शेख याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम