अटक करायला गेलेल्या पोलिसांवर दाखवला ‘रुबाब’ ! १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या त्या पत्रकाराने नक्की काय केलं ?

Ahmednagarlive24
Published:

एका माजी आमदाराला अश्रील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नगरमधील एका तोतया पत्रकारासह २ महिलांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इस्माईल दुराणी उर्फ भैय्या बॉक्सर, कल्पना सुधीर गायकवाड व बांगर नावाची एक महिला असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील भैय्या बॉक्सर व एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत बीड जिल्ह्यातील आष्टी – पाटोद्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी भैय्या बॉक्सर हा नगरमध्ये एक ऑनलाईन न्यूज पोर्टल चालवत पत्रकार म्हणूनमिरवत असे, तो व या २ महिला, असे तिघेजण गेल्या अनेक दिवसांपासूनमाजी आ. धोंडे यांना फोन करून पैशांची मागणी करत होत्या.

तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मिडियावर व्हायरल करुन तुमची बदनामी करु, तुमच्याविरुद्ध पोलिसांना बलात्काराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडू आणि तुमचं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपवून टाकू, अशी धमकी देत ब्लॅकमेल’ केले.

यातील भैय्या बॉक्सर याने धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून २५ हजार रुपये घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वारंवार होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून माजी आ. धोंडे यांनी नगरमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर शुक्रवारी (दि.२८) रात्री उशिरा फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तिघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३८४, ३८५, ३८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अटक करायला गेलेल्या पोलिसांवर दाखवला ‘रुबाब’
गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक भैय्या बॉक्सरच्या घरी त्याला अटक करण्यासाठी गेले. त्यावेळी मी पत्रकार आहे. प्रेस क्लबचा सदस्य आहे. तुम्ही मला अशी अटक करू शकत नाही, माझी वरपर्यंत पोहोच आहे.

विधानसभेत आणि संसदेत हा विषय उपस्थित करायला लावून तुमच्या नोकऱ्या घालविन, अशा प्रकारे पोलिस पथकाला त्याने धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याच्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करत त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe