अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : माजी सैनिकांच्या प्रस्तावित शहीद स्मारकासाठी मा.आ. शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने बुर्हाणनगर ग्रामपंचायतच्या वतीने 18 गुंठे जागा देण्यात आली असून,
तपोवन रोड गुरुकुल शाळेजवळील या जागेत मा.आ. कर्डिले यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. लवकरच माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सदर जागेवर भव्य शहीद स्मारक उभारण्यात येणार आहे.
जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षरोपण अभियानात आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नारायण अंकुशे, त्रिदल सेवाभावीचे अध्यक्ष संदिप लगड, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य श्रीधर पानसरे, गोपीनाथ डोंगरे, फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर,
भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, एस. भोसले, अफसर शेख, बन्सी दारकुंडे, शिवाजी गर्जे, माधव झिर्पे, शांतीलाल पवार, संपत तरटे, विकास जावळे, संतोष आव्हाड, सुरेश बडे, अमोल निमसे, जितेंद्र जोशी, संतोष शिंदे, गणेश अंधारे, विठ्ठल जोशी, कुशल घुले, मच्छींद्र बडे, महादेव शिरसाठ,
अनिल पालवे, गणेश अंधारे, तैय्यब बेग, संजू ढाकणे, भाऊसाहेब देशमाने, रामदास गुंड, सुरेंद्र खेडकर, अकबर शेख, संजय पाटेकर, भगवान डोळे, विठ्ठल लगड, अंबादास लहारे, तात्या कर्डीले, महादेव शिरसाठ, अंकुशराव भोस, वाघ मेजर, संतोष पालवे आदी माजी सैनिक उपस्थित होते. प्रास्ताविकात शिवाजी पालवे यांनी जिल्ह्यात मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक आहे.
देशसेवेचे कर्तव्य बजावताना अनेक शहीद देखील झाले आहेत. जिल्ह्यात शहीद स्मारक नसल्याची खंत होती. ही उणीव भरुन काढण्यासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.
यासाठी जागा उपलब्ध झाल्याने त्यांनी मा.आ. कर्डिले व बुर्हाणनगर ग्रामपंचायतचे विशेष आभार मानून लवकरच शहीद स्मारकासाठी जिल्हास्तरीय समिती नेमली जाणार असल्याची माहिती दिली.
शिवाजी कर्डिले म्हणाले की, सैनिक हा देशाचा अभिमान आहे. आपल्या जीवाची बाजी लावून ते सिमेवर देश रक्षणाचे कार्य करीत असतात. शहीद जवानांच्या स्मारकासाठी जागेचा आलेला प्रस्तावासाठी जातीने लक्ष घालून त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
हा स्मारक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी गर्जे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून शहीद स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्यात येणार असल्याचे सांगून, वृक्ष बँकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला. कुशल घुले यांनी आभार मानले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews