अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची थट्टाच! जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन 40 लाख क्विंटल आणि शासकीय खरेदी मात्र 7 हजार क्विंटल

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 40 लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते त्यातील फक्त 7000 क्विंटल ची खरेदी आतापर्यंत या केंद्रावर करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. जर टक्केवारी बघितली तर एकूण उत्पादन आणि करण्यात आलेली खरेदी यांचे प्रमाण 1% पेक्षा देखील कमी आहे.

Published on -

Ahilyanagar News:- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शासकीय हमीभावावरील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. आपल्याला माहित आहे की या शासकीय केंद्रांच्या माध्यमातून सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे नव्वद रुपये इतका दर मिळतो. त्यामुळे या शासकीय हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हा एक दृष्टिकोन आहे.

परंतु जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील सोयाबीन केंद्राचा विचार केला तर या ठिकाणी मात्र प्रत्यक्ष उत्पादन आणि करण्यात येत असलेली खरेदी याची तफावत जर बघितली तर ती खूप मोठी असल्याने ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच आहे असे म्हणण्यास वाव आहे.

एकटा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 40 लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते त्यातील फक्त 7000 क्विंटल ची खरेदी आतापर्यंत या केंद्रावर करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. जर टक्केवारी बघितली तर एकूण उत्पादन आणि करण्यात आलेली खरेदी यांचे प्रमाण 1% पेक्षा देखील कमी आहे.

जिल्ह्यातून 40 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन आणि शासकीय खरेदी मात्र 7000 क्विंटल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 40 लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते व त्या दृष्टिकोनातून जर आपण शासकीय हमीभावावरील सोयाबीन केंद्रावरील खरेदी जर बघितली तर आत्तापर्यंत फक्त सात हजार क्विंटलची खरेदी झाल्याचे चित्र आहे.

म्हणजे जिल्ह्यातील एकूण सोयाबीनचे उत्पादन आणि करण्यात आलेली खरेदी याचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा देखील कमी आहे. त्यातल्या त्यात ही खरेदी केंद्र फक्त जानेवारी महिन्यापर्यंत चालतील व त्यानंतर ते बंद करण्याचे निर्देश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरिपातील महत्त्वाचे पीक असून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन होते. परंतु बाजारभाव जर बघितले तर हमीभावापेक्षा कमी असून ते 3700 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल दराने सध्या खरेदी सुरू आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु या खरेदी केंद्राच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांची निराशाच करण्यात येत असल्याचे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा देखील कमी बाजारभावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

अत्यंत कासव गतीने या खरेदीची प्रक्रिया राबवली जात असल्याने तो केवळ देखावा असल्याचे शेतकऱ्यांचे याबाबतीत म्हणणे आहे. यावर्षी साधारणपणे 16 ऑक्टोबरला खरेदी केंद्रांची सुरुवात करण्यात आलेली आहे व ही खरेदी 11 जानेवारी 2025 अखेर पर्यंत करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची स्थिती
सध्या जिल्ह्यामध्ये पणन महासंघाची 11 सोयाबीन खरेदी केंद्र सध्या सुरू आहेत व यामध्ये शासन मान्यता प्राप्त सहा खाजगी एजन्सीकडून देखील केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत.

पणन महासंघाच्या माध्यमातून 16 ऑक्टोबर 2024 रोजी सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात झाली व आतापर्यंत फक्त सात हजार 352 क्विंटलची खरेदी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु यात खाजगी एजन्सी कडील खरेदीची आकडेवारी पणनच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!