अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले.
आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. आता सततच्या पावसाने पिकांवर रोगराईसारखे संकट वाढले आहे. उसावरील तपकिरी ठिपके व तांभेरा रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै ते डिसेंबर या कालावधीत आढळून येतो.
यावर्षी सततच्या पावसाने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने या रोगाचा प्रादूर्भाव वाढला असल्याचे राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुदर्शन लटके यांनी सांगितले. खुडसरगाव येथे त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.
* कशी घ्यावी काळजी-
- -ऊस पिकाचे सर्वेक्षण करून रोगाची लक्षणे तीव्रता व पिकाची अवस्था पाहून शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.
- – 86032 सारख्या रोगप्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी.
- – नत्राची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी.
- -पावसाळ्यात उसात जास्त दिवस पाणी साचून देऊ नये व रोगग्रस्त झालेली पाने बाहेर काढून नष्ट करावी.
- – तपकिरी ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅकोझेंब 3 ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड 3 ग्रॅम प्रतिलिटर यापैकी एका औषधांची फवारणी करावी, रोगट वाळलेली पाने काढून नष्ट करावी.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved