अहमदनगर जिल्ह्यातील सुरभि हॉस्पिटल रुग्णालय नव्हे; हे तर देवालय !!

तारकेश्वर गडाचे महंत प.पू. आदिनाथ शास्त्री महाराज यांची सुरभि हॉस्पिटलला सदिच्छा भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर: सुरभि हॉस्पिटल हे केवळ रुग्णालयात नव्हे; तर ते देवालय आहे. परमेश्वर जे उत्तम ठरवितो ते येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातून रुग्णसेवेच्या माध्यमातून घडवितो, असेच जाणवते आहे, असे शुभाशीर्वाद तारकेश्वर गडाचे महंत परमपूज्य आदिनाथ शास्त्री महाराज यांनी दिले.

प.पू. आदिनाथ शास्त्री महाराज यांनी काल रविवारी सुरभि हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या सर्व विभागांची जातीने पाहणी केली आणि येथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधांची माहिती घेतली. त्यावर समाधान व्यक्त करून त्यांनी रुग्णसेवेसाठी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर्सना शुभाशीर्वाद दिले.

महंत आदिनाथ शास्त्री यांनी यावेळी सुसज्ज अतिदक्षता विभाग, सुसज्ज कॅथलॅब, शस्त्रक्रिया विभाग, एम. आर. आय., सी. टी. स्कॅन विभाग, अत्याधुनिक रक्तपेढी, स्पेशल रूम, जनरल मेल आणि फिमेल वॉर्ड आदी विभागांना भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली.

यावेळी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बनचे चेअरमन डॉ. प्रशांत भालेराव, सुरभि हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के, संचालक ॲड. गणेश शेंडगे, डॉ. अमितकुमार पवार, डॉ .विलास व्यवहारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ .चंद्रशेखर जंगम, डॉ.पूजा शिरसाट, पी. आर. ओ. रुपेश ढाकणे, दत्तात्रय वारकड, तंत्रज्ञ मयूर तनपुरे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe