प्राचार्याचे विद्यार्थिनीशी ‘तसले’ चाळे ; विनयभंगासह ॲट्रॉसिटी दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशभरात दिवसेंदिवस घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. अनेक उपाययोजना होऊनही या घटना घडत असताना दिसत आहेत.

अशीच एक गुरु नात्यास काळिमा फासणारी घटना संगमनेरातील एका नामांकित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात घडली होती. प्राचार्याने विद्यार्थीनिशी अश्लिल चाळे करत शारिरीक व मानसिक त्रास दिला होता.

या प्राचार्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकऱणी पिडीत मुलीच्या विनंतीवरुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मैदानात उतरला असून,

या प्रकरणाची दखल महावि्यालयाच्या व्यवस्थापनाने वेळेवर न घेतल्याने, यात व्यवस्थापन व संस्थाचालक जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

याप्रकरणी 13 ऑक्टोबर 2020 रोजी शहर पोलिस ठाण्यात विनयभंग व अँट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकाराबाबत पिडीत मुलीने सहा महिन्यांपूर्वी व्यवस्थापन समितीला कल्पना दिली होती.

मात्र त्याच्यावर काहीच कारवाई न झाल्याने त्याची हिंमत वाढली होती. याप्रकरणी संस्थाचालक व व्यवस्थापनाने आरोपी प्राचार्याला पाठीशी घातल्याचा व गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. संस्थापक व व्यवस्थापन समितीला जबाबदार धरुन, संस्थेच्या मान्यता व परवाने रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment