निवडणुकीचे बिगूल वाजणार; जिल्हा बँकेसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जारी केले आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.

४ जानेवारीला जिल्हा उपनिबंधकांनी अंतिम मतदारयादी जाहीर केली. त्यानुसार बँकेसाठी ३ हजार ५७७ मतदारांची यादी अंतिम करण्यात आली आहे.

तालुकानिहाय मतदारांची संख्या अशी – अकोले २२५, जामखेड १११, कर्जत १६०, कोपरगाव ३६२, नगर ३६६, नेवासे २४४, पारनेर २२४, पाथर्डी १२४, राहाता २८९, राहुरी २४९, संगमनेर ६९१, शेवगाव ११८, श्रीगोंदे २७०, श्रीरामपूर तालुक्यात १४४ मतदार आहेत.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक अधिकारीपदी आहेर यांची नियुक्ती झाली आहे. आता जिल्हा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे.

या बँकेचे कार्यक्षेत्र मोठे असून शाखांचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात आहे. अनेक दिग्गज नेते बँकेवर असल्याने या निवडणुकीमुळे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment