Ahmednagar News : आधुनिक काळातही गरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाला नागरिकांकडून पसंती मिळत आहे.
आधी ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणावर माठांचा वापर होत असायचा, आता हे लोण शहरातही पसरले आहे. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक पिण्याच्या पाण्यासाठी माठाचा वापर करत आहे त. आरोग्याच्या दृष्टीने माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असल्याचे बोलले जाते.

त्यामुळे वॉटर प्युरीफायरचे पाणीही माठातच टाकण्यास अनेक जण पसंती देतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपले जगणे सुसह्य होत असते. फ्रिजमुळे पाण्यासह घरातील अनेक वस्तु, पदार्थ, भाजी, पाला थंड ठेवला जातो व त्यांचे आयुष्य वाढते.
असे असले, तरी माठाचा वापर मात्र आवश्यक या सदरातच केला जातो. त्यामुळे अजूनही घरा-घरात घडवंची व त्यावर ठेवलेला माठ दिसतोच.
फ्रिजमुळे आरोग्यास हानी
अनेक जणांना फ्रिजच्या पाण्यामुळे त्रास होतो. वारंवार सर्दी होणे, घसा खवखवणे, दात सळसळतात. असे लोक माठातील पाण्यालाच प्राधान्य देतात. विशेष म्हणजे फ्रिजच्या पाण्यापेक्षा माठातील पाण्याला वेगळीच चव असते. त्यामुळे ग्रामीण असो की शहरी, नागरिक माठातील पाणीच प्यायला प्राधान्य देतात.













