अंडी व कोंबड्या खाण्यापासून धोका नाही : जिल्हाधिकारी डॉ.भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-बर्ड फ्लूबाबत गैरसमज व अफवा पसरल्याने नागरिकांनी अंडी व कोंबड्याचे मास खाण्याचे बंद केल्याने कुक्कटपालकांचे मोठे नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना बर्ड फ्लू व मानवी आरोग्याबाबत प्रचार व प्रसार करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी अंडी व कोंबड्याचे मांस खाण्यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगून, चुकीच्या गोष्टी व अफवाला बळी न पडण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. देविदास शेळके, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाळकृष्ण शेळके, संतोष कानडे, दीपक गोळक, डॉ.उमाकांत शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास झरेकर, संदीप काळे, रविंद्र गायकवाड आदींसह पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात ५२ पक्षी मरण पावले असून, मात्र याबाबत अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. यामुळे भिती बाळगण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पाश्र्­वभूमीवर बिडसांगवी गावाला कंट्रोल झोन म्हणून घोषित केला आहे व इतर भाग अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे.

पक्षी मृत होत असतील तर त्या भागातील पक्ष्यांची वाहतूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. या संदर्भात शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली असता मनुष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले नाही. जिल्ह्यात अफवा व गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

कोंबडी व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसून, यापासून धोका नाही. कोंबडीचे मास व अंडी खाणे कोणत्याही प्रकारे धोकादायक नसून,

समाजमाध्यांच्या चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असल्याचे अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्लू संदर्भात गैरसमज व अफवा पसरवर्णा­यांवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.