Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला असून प्रचाराचा धुराळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या प्रचाराच्या प्रसंगी प्रत्येक उमेदवार हा गावांमध्ये भेटीगाठी घेत असून यादरम्यान मतदारांशी संवाद साधण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान 20 नोव्हेंबर आणि निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे कमी वेळ असल्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ होताना सध्या दिसून येत आहे.

अगदी याच पद्धतीने जर आपण राहुरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार आ. प्राजक्त तनपुरे यांचा विचार केला तर त्यांनी देखील आता प्रचारात वेग घेतला असून मतदार संघातील अनेक गावांमध्ये प्रचार दौरे ते करत आहेत व या दरम्यान मतदारांशी संवाद साधताना ते दिसून येत आहेत.
अगदी याच पद्धतीने त्यांनी राहुरी तालुक्यातील वळण, वळण पिंपरी तसेच चंडकापूर इत्यादी गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला व त्या दरम्यान त्यांनी महिलांची सुरक्षितता या विषयावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,महायुती सरकारला महिलांचे काही एक देणे घेणे नसून राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत.
त्यामुळे या सरकारला पायउतार करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. इतकेच नाही तर लाडकी बहीण योजना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मत मिळवण्यासाठी आणली गेल्याचा आरोप देखील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यानिमित्ताने केला.
महायुती सरकारला पायउतार करण्याची हीच योग्य वेळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला असून त्यांनी गावागावांना भेटी द्यायला सुरुवात केली आहे व काल त्यांनी राहुरी तालुक्यातील वळण पिंपरी तसेच चंडकापूर इत्यादी गावांमध्ये भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. या संवादा दरम्यान त्यांनी म्हटले की या सरकारला महिलांचे काही देणे घेणे नाही व राज्यांमध्ये महिला असुरक्षित आहेत.
त्यामुळे या सरकारला पायउतार करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की ही योजना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मत मिळवण्यासाठी आणली गेली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
तसेच त्यांनी पुढे बोलताना म्हटले की बदलापूर येथे शाळकरी मुलीवर अत्याचार झाला. त्यावेळी मात्र पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ करण्यात आला. पोलिसांनी अत्यंत हलगर्जीपणा केला व सरकार सक्षम नाही.
इतकेच नाही तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे व त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मतदार संघात दिवसा वीज मिळावी म्हणून प्रकल्प उभे केल्याचे देखील त्यांनी म्हटले.
शेतकऱ्यांना मागेल त्याला ट्रांसफार्मर दिले.इतकेच नाहीतर मतदार संघामध्ये शेकडो कोटी रुपयांची विकास कामे देखील केली. आपल्या तालुक्यातील स्थानिक आमदारच आपल्या गरजा ओळखू शकतो.
म्हणून अडीच वर्षाच्या मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ज्या वेगाने विकास कामे केली त्यांचा दुप्पट गतीने आगामी काळात आपण विकास कामे करू असा विश्वास देखील त्यांनी मतदारांना या निमित्ताने दिला.