टेम्पोच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखाना उस तोडीस आलेल्या चाळीसगाव येथील रहिवासी यांच्या बैलगाडीस मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. याला अपघातात दोन्ही बैल जागीच ठार झाले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी राजाराम राठोड व त्यांचे सहकारी हे ऊस तोडणी करण्यासाठी कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी मुकादम कैलास राठोड यांच्या टोळीमार्फत आलेले आहेत

. दरम्यान विष्णू राठोड यांची बैलगाडी जेऊर कुंभारी येथील हद्दीत ऊस तोडणीसाठी जात होती. बैलगाडी जात असताना मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात त्यांची गाडी ही रस्त्याच्या खाली जोराने जाऊन पडली.

या अपघातात विष्णू राठोड यांचे दोन्ही बैल जागीच ठार झाले तर गाडीवान विष्णू राठोड गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकार्यांनी या घटनेबाबत कारखाना कार्यालयास कळविले.

व त्यांनी तातडीने रुग्ण वाहिका पाठवून जखमीस सरकारी ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. टेम्पो चालक मात्र त्या ठिकाणाहून फरार झाला आहे.

याप्रकरणी राजाराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आयशर टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News