अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोनाच्या लढ्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. यासाठी लसीकरण मोहीम वेगाने व प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
तरच आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ शकतो. मात्र एकीकडे हे सगळं असताना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेकदा हि मोहीम खंडित होते.
यातच श्रीरामपूर येथील आगाशे हॉल, आझाद मैदान लसीकरण केंद्रावर येथे आज बुधवार दि. 02 जून 2021 रोजी लसीकरण बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरीच थांबावे.
विचारपूस करण्यास लसीकरण केंद्रावर जाऊ नये. पुढील नियोजित लसीकरण सत्राची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर देण्यात येईल, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात तालुक्यात 71 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान या कोरोनाबाधितांची भर पडल्याने तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कालअखेर 1092 झाली आहे.
या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 14726 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 13514 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम