दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण; मंत्री तनपुरेंनी दिले आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-डोंगरगण येथे मंत्री तनपुरे यांनी नुकताच जनता दरबार भरविला होता. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा मंत्री तनपुरे यांच्यासमोर वाचून काढला.

यावेळी पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार डोंगरगण (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरेंकडे केली.

जनता दरबारात दूषित पाणीपुरवठ्याविषयीच्या तक्रारीचे मंत्री तनपुरेंकडून तातडीने निवारण करण्यात आले. तनपुरे यांनी गावाला पिंपळगाव माळवी तलावातून स्वतंत्र पाइपलाइनसाठी दहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.

प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत, गावात शुद्ध पाण्यासाठी दोन ॲरोंची तातडीने व्यवस्था केली. दरम्यान या आयोजित जनता दरबारामध्ये त्यांनी गावातील दोन मुख्य रस्ते, शेतकऱ्यांना विजेसाठी नवी तीन वीजरोहित्रे, व्यायामशाळा,

घरकुल, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विषय मार्गी लावले. मंत्री तनपुरे म्हणाले, “”ग्रामस्थांनी विकासकामांसाठी संघटित राहावे. गावात एकोपा असेल, तर त्यांना विकासकामांपासून कोणीही रोखू शकत नाही.

डोंगरगणला धार्मिक व पर्यटकीय महत्त्व असल्याने, येथे भाविक व पर्यटकही येतात. त्या अनुषंगाने पर्यटन आणि देवस्थान परिसरात विकासकामे करू.

गावात वीज, पाणी, रस्ते, तसेच महत्त्वाच्या अन्य कामांसाठी ग्रामस्थांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी याचवेळी बोलताना केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, मंडलाधिकारी वृषाली करोसिया,

तलाठी वर्षा शिंदे, विस्ताराधिकारी ठकाराम तुपे, ग्रामसेवक सुरेश सौदागर, कृषी सहायक अभिजित डुक्रे, पोलिस पाटील आदिनाथ मते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment