‘त्या’ गुटखा छाप्यातील ‘त्या’ जागेचा मालक कोण ?

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले.

आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस यंत्रणेने अर्धा कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला, मात्र या जागेच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एक आठवडा उलटूनही लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पुढील तपास आपले कौशल्य पणाला लावून त्यात यश मिळवले. मात्र मुख्य आरोपी शोधत असताना पुढे त्यांनी ज्या जागेवर गुटखा साठा सापडला त्या मूळ मालकाचा तपास कासवगतीने सुरू केला.

या परिसरात सुमारे 100 एकर क्षेत्र असून लगत शेती महामंडळाचे दोन तुकडे आहेत. एक क्षेत्र दोन एकरचे तर दुसरे क्षेत्र साडे चार एकर आहे. या क्षेत्रालगत असलेल्यांनी हे क्षेत्र पूर्णपणे हडप केल्याने गुटखा छाप्यातील मूळ मालकाचा शोध घेत असताना पोलीस प्रशासन चक्रावले आहे.

त्यामुळे पोलीस प्रशासन शेती महामंडळाकडे यासंदर्भात माहिती घेत आहे. शेती महामंडळाला प्रथमतः प्रकरणाशी संबंधित असलेल्या गटात महामंडळाची शेती आहे की नाही हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे. लवकरच गुटखा छापा क्षेत्र कोणाचे व अतिक्रमण कोणाचे, छाप्यातील ठिकाणच्या मालकांचा अतिक्रमणमध्ये समावेश आहे का,

ज्या खासगी शेतकर्‍याने ज्याला कराराने शेती दिली होती त्या जागेत गुटखा छाप्याच्या अड्ड्याचा समावेश होतो का, हे पुढे तपासात लवकरच समोर येईल. गुटखा प्रकरणात तपास जलदगतीने होत आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे.

ज्या ठिकाणी छापा पडला होता, त्या ठिकाणच्या मालकाचा शोध चालू असून, लवकरच त्याचा उलगडा होईल, जागा मालकाचा संबंधित गुटखा प्रकरणात सहभाग कोणत्या प्रकारे होता किंवा त्यासोबत कोण कार्यान्वित होते.

तसेच ज्याठिकाणी गुटखा सापडला आहे त्याठिकाणाहून माल कुठेकुठे व कोण पोहोच करीत असे याबाबत सखोलपणे माहिती घेणे चालू आहे अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment