शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभागात ठिय्या आंदोलन प्रश्‍न सुटत नसल्याने शिक्षकांची जोरदार निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्‍नांची सोडवणूक होत नसल्याने अहमदनगर जिल्हा व महानगर माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद मधील माध्यमिक शिक्षक विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. वारंवार आंदोलन करुन प्रश्‍न सुटत नसल्याने आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. तर वेतन पथक कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतरांची कामे पैश्याशिवाय होत नसल्याचा आरोप करुन … Read more

इम्रान बागवान यांची काँग्रेसच्या शहर जिल्हा सरचिटणीस पदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- इम्रान उमर बागवान यांचे काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे तसे नियुक्तीचे पत्र शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ काळे यांच्या हस्ते इम्रान बागवान यांना काँग्रेस कमिटीत झालेल्या समारंभामध्ये प्रदान करण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रक तथा काँग्रेसच्या बांगलादेश मुक्ती संग्राम अभियानाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६ जणांच्या कुख्यात टोळीविरुध्द मोक्का

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या कट रचून दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख सुरेश रणजित निकम, (रा. कात्रड, ता. राहुरी) व त्याच्या टोळीतील पाच जणांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला २२ सप्टेंबर रोजी विशेष पोलिस … Read more

नगर जिल्ह्यात पावसाची सेंच्युरी तर ‘या’ ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाच्या सरी पुन्हा एकदा जोरदार कोसळू लागल्या आहेत.. यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडलात एकच दिवसात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११४. ४ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून … Read more

व्यापाऱ्यांचे कोरोना काळात आकारलेले विविध कर माफ करावेत

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर सुरु झालेलं लॉकडाऊनची मालिका आजही कायम असून यामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. देशासह गावपातळीवर याचे मोठे परिणाम जाणवू लागले आहे. यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यातच नगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीने शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे कोरोना काळात आकारलेले विविध कर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. वाडेगव्हाणमधील अलभरवाडी शिवारात शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८ रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येउन … Read more

मोठी बातमी ! जिल्ह्यातील आता ‘या’ तालुक्यातील 6 गावांमध्ये लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गाडेकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीयेथे भेट देऊन कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला. बेलवंडी गावात 10 पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असल्याने बेलवंडी गाव बंद करण्याचा निर्णय प्रशासननाने घेतला असल्याचं सांगितलं. दरम्यान कोरोनाच्या पार्शवभूमीवर विभागीय आयुक्तांनी परिस्थितीचा … Read more

महागाईचा अगडोंब: गवार, वाटाण्यासह भाजीपाला महागला..!

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- आधीच कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य दोन वेळच्या जेवणासाठी राबत आहे. एकीकडे किराणासह इतर जीवनावश्यक मालाचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत. तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर शेतमालाचे दर दुप्पट वेगाने कमी होत आहेत. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य वर्ग कमालीचा आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी … Read more

दिवाळीपूर्वीच किराणा मालासह सुकामेवाही महागला?

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- ऐन सणासुदीच्या काळात दिवाळी सणापूर्वीच किराणा मालासोबतच सुकामेव्याच्या किमतीत ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात इम्युनिटी वाढीसाठी सुका मेवा वापरात वाढ झाली. परिणामी ७०० ते ८०० रुपये किलो असलेला बदाम आता ११०० ते १२०० रुपये किलो ने तर काजू ९०० ते ११०० रुपये दराने विकले … Read more

महावितरणच्या सावळ्यागोंधळाचा फटका…! विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी तर शेळी ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- विजेचा जबर शॉक लागल्याने मुलगी जखमी झाली तर शेळी ठार झाल्याची घटना नगर तालुक्यातील जेऊर येथे काल घडली. यावेळी नागरिकांनी महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जेऊर येथील लिगाडे वस्तीवर विद्युत वाहिनी तुटल्याने जमिनीवर पडली होती. तेथे शेळ्या चारणारी मुलगी चैत्राली भाऊसाहेब तोडमल (वय १२) हिला विजेचा … Read more

अन ‘त्याने’ घराच्या पडवीतच आपले जीवन संपवले…’या’ तालुक्यातील दुर्दैवी घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कर्जबाजारीपणाला कंटाळून एका युवा शेतकऱ्याने घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील वैजुबाभूळगाव येथे घडली. येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे असे त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद … Read more

म्हणून संतप्त झालेल्या सरपंचानी ग्रामपंचायत कार्यालय केले सीलबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना देऊनही ग्रामविकास अधिकारी गुरव कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेऊन गायब झाले. हा प्रकार पाहून सरपंच सरपंच महानंदा मांडे यांनी ग्रामपंचायतीचे कार्यालयच सीलबंद केले. तसेच मांडे याची याप्रकरणाची गटविकास अधिकारी गोरख शेलार यांच्याकडे तक्रार केली आहे. … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील ३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. नुकतेच या मुद्द्यावरून विभागीय आयुक्तांनी देखील प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे. यामुळे आता प्रतिबंधात्मक पाऊले उचलली जाऊ लागली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील ३१ गावांमध्ये करोना बाधितांची संख्या दिवस गणीक वाढत असल्याने ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील ‘या’ लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय ! पोलिसांनी छापा टाकून…

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील यशवंत लॉजवर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आहे. तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी ,सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस पथकाने हि कामगिरी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, हॉटेल यशवंत मध्ये काही महिलांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याची … Read more

पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- मागील दीड वर्षापासून पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वाद ग्रस्त ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्याची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

युपीएससीत नगर जिल्ह्याच्या सुपुत्रांनी रोवला झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये नगर जिल्ह्यातील ५ जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये विनायक नरवडे (रँक ३७), सुहास गाडे (रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) हे यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे … Read more

नगर शहर व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घ्या मोफत

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे मोफत दर्शन होणार असून, महापालिकेच्या वतीने मोफत बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासाठीचा महापालिकेचा हा पहिलाच उपक्रम असून येत्या पर्यटन दिनी म्हणजेच सोमवारपासून ही मोफत बससेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली आहे. महापालिकेचे प्रसिद्धी … Read more

पशू वैद्यकीय अधिकाऱ्यास वेळ नसल्याने बिबट्याच्या हल्ल्यात मृत शेळी शवविच्छेदनसाठी आणली पंचायत समितीत..?

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-   बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू पावलेल्या शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळ नसल्याचे सांगत संबंधित शेतकऱ्याला मृत शेळीचे शवविच्छेदन करण्यासाठी ती शेळी पंचायत समिती येथे आणण्यास सांगितल्याचा प्रकार श्रीगोंदा येथे घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली शेळी थेट श्रीगोंदा पंचायत समिती येथे आणल्याने एकच खळबळ उडाली … Read more