काहीतरी गडबड आहे; राज्यातील सरकार कधीही कोसळणार…?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- काहीतरी गडबड सुरू असल्याने राज्यातील सरकार कोणत्याहीक्षणी पडू शकते, असा गौप्यस्फोट माजी जलसंधारणमंत्री व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री राम शिंदे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७८२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ८२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जन्मदात्या पित्याची मुलाकडून हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- सकाळी प्रात:र्विधीसाठी शेतात गेलेल्या वृद्ध वडिलांची त्याच्या दोघा मुलांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कारेगाव येथे घडली असून याबाबत दुसऱ्या पत्नीच्या फिर्यादीवरून तिच्या दोघा सावत्र मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सुनिता उर्फ शालनबाई लक्ष्मण लोणारे (वय 36) धंदा-शेती रा. कारेगाव ता.नेवासा यांनी … Read more

युवकांनो, तुम्ही अशा भानगडीत पडूच नका, ‘या’ पोलीस निरीक्षकांनी केले भावनिक आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- ‘प्रेम आणि ‘शारिरीक आकर्षण’ यात वाहत चाललेल्या युवा वर्गाचे खूप मोठे नुकसान होत आहे. प्रसंगी युवक टोकाची भूमिका घेत आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करताना दिसत आहेत.ज्या वयात या अनावश्यक बाबींना फाटा देत आपले ध्येय पुर्ण करण्याकडे लक्ष देण्याऐवजी प्रेम व शारीरिक अकर्षणात गुरफटून जात आहे. मित्रांच्या नादाने … Read more

नगर जिल्ह्यातील ‘ या’ साखर कारखान्याची नियमबाह्य ऑनलाईन सभा रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २९ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली ऑनलाईन सर्वसाधारण सभा पूर्णपणे नियमबाह्य असून ती रद्द करावी तसेच गाळप हंगाम २०२०-२१ चे दुसरे पेमेंट ८०० रूपये प्रतिटणाप्रमाणे करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्यावतीने अशोक कारखान्याच्या … Read more

… अन्यथा समृद्धी महामार्गाचे एकही वाहन जाऊ देणार नाही, मनसेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- मुंबई व नागपूर या दोन महानगरांना जोडणार्‍या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु, या कामासाठी वापरात येणार्‍या वाहनांनी कोपरगाव तालुक्यातील खोपडी-भऊर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तत्काळ हा रस्ता तयार करुन द्यावा. अन्यथा, समृद्धी महामार्गाचे एकही वाहन या रस्त्यावर चालू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र … Read more

‘अशोक’चे संचालक मंडळ तातडीने अपात्र करा, शेतकरी संघटनेची प्रादेशिक सहसंचालकांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  प्रादेशिक सहसंचालक व निबंधकांना वार्षिक लेखा परिक्षा अहवाल सादर न करताच सभासदांची ऑनलाईन सभा बेकायदेशीरपणे जाहीर करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ सहकारी संस्था अधिनियम कलम ७५ (५) अन्वये तातडीने अपात्र करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रादेशिक सह संचालकांना पाठविलेल्या निवेदनात … Read more

सभासदाला माहिती देण्याचे डॉन बॉस्को पतसंस्थेस राज्य माहिती आयोगाचा आदेश

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  शहरातील डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेस राज्य माहिती आयोगाने सभासदाला विनामुल्य पतसंस्थेच्या सभेचे इतिवृत्त व अहवाल विनामुल्य देण्याचे आदेश काढले आहे. यावरुन पतसंस्थेच्या सभासदांना माहिती घेण्याचा अधिकार असल्याचा स्पष्ट होत आहे. डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद रमेश बाबुराव आल्हाट यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकारात … Read more

तृतीयपंथी यांनी घेतलेल्या जागेवर ताबा मारणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- बेकायदेशीर ताबा हटवून पोलीस संरक्षणात गाळा ताब्यात मिळण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अहमदनगर पोटतुकडी नगपैकी महानगरपालिका हददीतील मौजे चौहुराणा बुद्रुक येथील टी पी स्किम नंबर ०३ मधील प्लॉट नंबर १७ मधील दुमजली इमारत ही (मार्केट यार्ड अहमदनगर ) … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 830 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : प्रवाशाची हत्या करणारे चार तृतियपंथी १२ तासांच्या आत जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील गणेशनगर फाटा येथे पैसै न दिल्याचे कारणावरुन रस्त्याने जाणा-या प्रवाशाची हत्या करणारे चार तृतियपंथी आरोपी त्यांचे चार साथीदारासह १२ तासांचे आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, (वय २६, रा. सुभाष कॉलनी, वार्ड नं. ६, श्रीरामपूर) , … Read more

मिस इंडिया 2020 च्या उपविजेत्या मान्या सिंह रविवारी शहरात

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेता ठरलेल्या मान्या सिंह (मिस इंडिया रनर्स अप) या रविवार दि. 19 सप्टेंबरला शहरात येत आहे. मोरया युवा प्रतिष्ठाण मंडळाच्या गणेश विसर्जनाकरिता त्या उपस्थित राहणार आहे. त्यांना मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अर्जुन मदान यांनी गणेश विसर्जन करिता आमंत्रित केले आहे. गुलमोहर रोड येथे हा कार्यक्रम … Read more

नगर कल्याण रोड सिना नदी पुल येथे रास्ता रोको आंदोलन.

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- शिवाजी नगर नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंत हा रोड पावसाळ्यात अत्यंत खराब झालेला असून वारंवार निवेदन पत्र देऊन त्यावर आतापर्यंत मुरूम टाकून देतात व दुरुस्त करणे या गोष्टी सर्व गोष्टी करूनही रोड पुन्हा खराब खड्डेमय झालेला असल्याच्या निषेधार्थ नगर कल्याण रोड शिवाजीनगर येथे रस्ता रोको नगरसेवक स्थायी … Read more

ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  आर्थिक भार विरहित मागण्यावर लवकरच निर्णय घेऊ व आर्थिक बोजा पडणाऱ्या मागण्या कोरोना लाट आटोक्यात आल्यानंतर निर्णय घेऊन ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या मागणीनुसार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास मंत्रालय व … Read more

महाविकास आघाडीचे कृत्य ओबीसी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळणारे -ऍड. संदीप ताजने

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकीय आरक्षणासंबंधी इतर मागासवर्गीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ऍड.संदीप ताजने यांनी शहरात आयोजित संवाद यात्रेच्या कार्यक्रमात केला. ओबीसींची बोळवण करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेशाची शक्कल लढवली आहे. पंरतु या अध्यादेशानंतर देखील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या 10 ते 12 टक्के … Read more

हिंदूराष्ट्र सेनेने नेहमीच दीन-दुबळयांना मदतीचा हात दिला -अभिषेक कळमकर

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- हिंदूराष्ट्र सेनेने नेहमीच दीन-दुबळयांना मदतीचा हात दिला आहे. हिंदूत्वाने भारावलेले युवक जनसामान्यांसाठी सामाजिक उपक्रम राबवित असून, युवकांची ही चळवळ प्रेरणादायी आहे. गणेशोत्सव काळात युवकांनी एकत्र येऊन राबविलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले. हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे. नुकतेच … Read more

सरपंच परिषदेच्या नगर तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल डोंगरे यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची सरपंच परिषदेच्या नगर तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक नंदकुमार औटी यांनी त्यांचा सत्कार केला. पै. डोंगरे यांनी पारनेर येथे निलेश लंके प्रतिष्ठान युवक संपर्क कार्यालयास भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे युवक … Read more

आदिवासींच्या जमीनी बळकाविणार्‍या वांगदरीच्या माजी सरपंचवर कारवाई करावी

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  आदिवासींच्या जमीनी बळकाविण्याचा प्रयत्न करणार्‍या वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथील माजी सरपंचवर कारवाई होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने गावातील आदिवासी बांधवांनी काळी आई मुक्तीसंग्राम जारी केला आहे. माजी सरपंचाचा राजकीय वरदहस्त असल्याने आदिवासी समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री, महसुलमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. … Read more