नगर कल्याण रोड सिना नदी पुल येथे रास्ता रोको आंदोलन.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- शिवाजी नगर नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंत हा रोड पावसाळ्यात अत्यंत खराब झालेला असून वारंवार निवेदन पत्र देऊन त्यावर आतापर्यंत मुरूम टाकून देतात व दुरुस्त करणे या गोष्टी सर्व गोष्टी करूनही रोड पुन्हा खराब खड्डेमय झालेला असल्याच्या निषेधार्थ नगर कल्याण रोड शिवाजीनगर येथे रस्ता रोको

नगरसेवक स्थायी समिती सदस्य सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, दिनकर आघाव, जयप्रकाश डीडवानिया, संजय साकुरे, सुबोध कुलकर्णी आदीसह नागरिक उपस्थित होते नगर कल्याण रोड नॅशनल हायवे असल्यामुळे शहरी भागातून जातो त्यामुळे या ठिकाणी जाण्याची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे

या रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच पावसाळ्याच्या पाण्यामुळे प्रकट झाला असून त्यावरून गाडी स्लीप पसरत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून निष्पाप लोकांना जीव कमवा लागत आहे नागरिकांचे प्रचंड या रस्त्यावर हाल होऊन लवकरात लवकर रस्त्याचे पॅकिंग व सिंगल हात कार्पोरेट चे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते

त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता आज 17 सप्टेंबर कल्याण रोड सिना नदी पुल येथे तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको करण्यात आले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी पत्र देण्यात आले की कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील अहमदनगर बायपास ते सक्कर चौक व स्टेट बँक चौक ते मेहेकरी या १८.५० किमी लांबीमध्ये डांबरी मजबुतीकरणाचे काम व उड्डाणपुल ते सीना नदी पर्यंत दोन्ही बाजूस काँक्रीट गटर बांधण्याचे काम मंजुर आहे.

रस्त्याच्या उड्डाणपुल ते नेप्ती नाका ते अमरधाम या लांबीमध्ये पावसाळा असल्यामुळे खड्डे भरणेचे काम यापूर्वी wmm (खडी) मटेरिअलने करण्यात आले होते. तसेच काही भागात डांबरीकरणानेही खड्डे भरणेचे काम करण्यात आले होते परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुन्हा नव्याने खड्डे पडलेले आहेत.

सद्यस्थितीत पाऊस थोडा थांबला असलेने वरील लांबीमध्ये त्वरित डांबरीकरणाने खड्डे भरणेबाबत कंत्राटदारास सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कंत्राटदाराकडुन डांबरीकरणाने खड्डे भरेणेबाबत काम सुरु करण्यात येत आहे. तसेच या भागातील डांबरीकरणाचे काम निविदेनुसार पुर्ण करून लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करणेत येईल याबरोबरच काँक्रीट गटारचे कामही त्वरीत सुरु करणेचे नियोजन केले आहे.

कार्यालयाकडून कंत्राटदाराकडे कामाकरिता नियमित पाठपुरावा करण्यात येत असू लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यात येईल. नियोजित रस्ता रोको आंदोलन मागे घ्यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.