अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…

Ahilyanagar Breaking : मस्साजोग घटनेची धक्कादायक आठवण ताजी असतानाच, अहिल्यानगरमध्ये एक थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नगर-मनमाड रोडवरील विळदघाट परिसरात डोंगरावर नेऊन जाळून टाकला. या घटनेने … Read more

संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय

Ahilyanagar Report : गेल्या ४०-४५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत संगमनेरमध्ये सत्ताबदल झाला. हा धक्का केवळ संगमनेर, अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रालाच बसला नाही, तर थेट देशात या लढाईची चर्चा झाली. अमोल खताळ कोण? या एका ‘पीन पाँईंट’वर शेकडो व्हिडीओ आणि हजारो न्यूज तयार झाल्या. राज ठाकरेंपासून ते थेट राहुल गांधींपर्यंतच्या नेत्यांनी संगमनेरच्या लढतीवर भाष्य केले. ईव्हीएम मॅनेज … Read more

आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयास 42 गावातील ग्रामसभांचा ठरावाद्वारे विरोध

Sangamner News : संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव आहे. याला तालुक्यातून प्रखर विरोध होत असून 62 पैकी 42 गावांनी ग्रामसभा घेऊन हा अन्यायकारक प्रस्ताव तातडीने रद्द करावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तहसीलदार कार्यालय येथे विविध गावांमधील नागरिकांनी अखंड संगमनेर तालुका कृती समितीच्या वतीने आश्वी बुद्रुक … Read more

Big Breaking ! ग्रामसभेतून सरपंचासह विखे समर्थकांनी काढला प्रळ ! ग्रामसभेत बहुमताने…

संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला. … Read more

Somwar Upay : सोमवारी करा हे उपाय, आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारं उघडतील

Somwar Upay : सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. जर तुम्हाला जीवनात संकटे, अडथळे किंवा अडचणींचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचे नशिब बदलू शकता. शिवलिंगाचे दर्शन आणि पूजा सोमवारी जवळच्या … Read more

लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहतील: मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

Devendra Fadnavis News

३ मार्च २०२५ मुंबई: सरकारचा पहिला अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीने मांडून आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना चालू राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्य विधिमंडळाचे दुसरे तर पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अपेक्षे प्रमाणे विरोधकांनी … Read more

रक्तरंजित कट! ९ आरोपींनी मिळून केली थरारक हत्या,केस कापायला गेलेला तरुण घरी परतलाच नाही…

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका 19 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह केकताई येथील डोंगराळ भागात जाळून विल्हेवाट लावण्यात आली. वैभव शिवाजी नायकोडी असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणात तोफखाना पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 आरोपींना अटक केली … Read more

अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचं काय होणार ? प्रशासन, राजकीय नेते आणि लोकांच्या भावना…

Ahilyanagar Report :  विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सभापती झाल्यामुळे अनेक मुद्यांवर बोलण्यासाठी त्यांना मर्यादा आल्या. मात्र पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन या मुद्यावर त्यांनी आपले मत मांडले. जिल्हा विभाजनावर ते ठाम राहिले. त्यानंतर गुरुवारी पत्रकारांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनाही जिल्हा विभाजनावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर तेही … Read more

अहिल्यानगर हादरले ! अपहरणानंतर युवकाचा निर्घृण खून, डोंगरात जाळल्याची कबुली

तपोवन रस्ता परिसरातून अपहरण झालेल्या युवकाचा खून करून त्याला डोंगरात जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19, रा. ढवणवस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी त्याला जाळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ही घटना 22 फेब्रुवारी 2025 … Read more

Sangamner Politics : नवीन लोकप्रतिनिधीकडून तालुक्याची घडी विस्कटवण्याची सुरुवात !

amol khatal

Sangamner Politics : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून आणि कामातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. निळवंडे धरण व कालवे त्यांनीच पूर्ण केले. निवडणुकीत ईव्हीएम मॅनेज करून त्यांचा घात करण्यात आला. मात्र अवघ्या तीनच महिन्यात जनतेला तालुक्यातील त्यांच्या नेतृत्व नसल्याचे चटके जाणू लागले असून नवीन लोकप्रतिनिधी हे विजेचा खेळ खंडोबा, पाणी प्रश्न यावर जनतेचे बाजूने हवे … Read more

अहिल्यानगर करांनो, सावध व्हा ! आपल्या बसस्थानकांची स्थिती ‘स्वारगेट’ होणार नाही ना ?

Ahilyanagar Special Report : स्वारगेट बसस्थानकात तीन दिवसांपापूर्वी तरुणीवर अत्याचार होण्याची घटना घडली. त्यानंतर बसस्थानके महिलांसाठी असुरक्षित असल्याचे चर्चा अचानक वाढल्या. स्वारगेटच्या एका घटनेने सरकारची यंत्रणा खडबडून जागी झाली. स्वारगेट बसस्थानकातील गॉर्डचे निलंबन, अधिकाऱ्यांची चौकशी असे सगळे सोपस्कार पूर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बसस्थानके, तेथील सीसीटीव्ही, पथदिवे, महिला शौचालय, गार्ड, वाँचमेन, अधिकारी यांची चर्चा … Read more

Shaktipeeth Highway : कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध ! नागपूर-गोवा महामार्गावर मोठा निर्णय

Shaktipeeth Highway : मुंबई : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध कायम असून, त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कोल्हापूरचा प्रस्तावित मार्ग बदलण्याचा विचार सुरू केला आहे. कोल्हापूरमधील संरेखन टाळून महामार्ग कोकण मार्गे नेता येईल का, यासाठी पर्यायी संरेखनाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. तथापि, विरोध मावळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि विरोध कायम … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : नृत्यांगनेच्या घरात मध्यरात्री महिलेच्या मदतीने दरोडा ! पोलिसही शॉक…

Ahilyanagar News : नगर जिल्ह्यात एका नृत्यांगनेच्या घरावर झालेल्या अनोख्या दरोड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. एका महिलेच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून दरोडेखोरांनी हा गुन्हा केला. ही नवीन चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले आहेत. जामखेड शहराच्या जवळील साकत फाट्याजवळ या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेचा उपयोग करून घरात प्रवेश बुधवारी मध्यरात्रीच्या … Read more

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगणार !

Pune News : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः युवा नेते युगेंद्र पवार यांनी या निवडणुकीच्या तयारीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, ते स्वतः निवडणूक लढणार की नाही, याचा निर्णय शरद पवार यांच्या सूचनेनंतर घेतला जाईल, असे … Read more

कॅरिअर मायडीया कंपनीत महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग ! HR आणि वर्कमॅनवर गुन्हा दाखल

Parner News : कॅरिअर मायडीया या बहुराष्ट्रीय कंपनीचा एच.आर. पंकज यादव तसेच वर्कमॅन ऋषीपालसिंग यांनी कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित महिलेने सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या दिड वर्षांपासून पिडीत महिला कॅरीअर मायडीया या कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होती. … Read more

प्रधानमंत्री सहाय्यता निधीत खा. लंके राज्यात अव्वल ! खा. लंकेंनी स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला

प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देत खासदार नीलेश लंके यांनी नवी दिल्लीमध्येही आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. दरवर्षी प्रत्येक खासदाराला असलेला ३५ केसचा कोटा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोटयातून २७ केसेससाठी निधी मिळवत नीलेश लंके हे सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देणारे खासदार ठरले आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभेत पारनेर-नगर … Read more

अतिक्रमणासंदर्भात संसदेत आवाज उठविणार ! न्यायालयीन लढाई देखील लढणार – खा. नीलेश लंके आक्रमक

सर्व पुरावे असतानाही बुऱ्हानगर येथे भगत परिवाराचे मंगल कार्यालय तसेच वडगांव गुप्ता येथील गरीब मागासवर्गीय बांधवांच्या घरावर बेकायदेशीर ररित्या बुलडोझर फिरवून अन्याय केल्यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले. बुऱ्हानगर येथील भगत यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यात आल्यानंतर वडगांव गुप्ता येथेही प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण असल्याचे सांगत घरे जमीनदोस्त करण्यात आली. खा. … Read more

राज्यात प्रसिद्ध असलेल्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी ! ग्रामसभेचा ठराव; राज्यात उडाली खळबळ

Ahilynagar Breaking News : राज्यात प्रसिध्द असलेली पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र यंदा या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. मढीच्या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणारी मढीची … Read more