सलूनवाल्याच्या हट्टापायी रोहित पवारांनी केली शेव्हिंग !

जामखेड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारी असणाऱ्या सलूनमध्ये केसांची कटींग करत शेव्हिंग केली. जामखेड येथील … Read more

भाजप प्रवेश केल्याने विखे पाटील यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात !

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता संघाच्या दक्षेते खाली आहेत. त्यामुळे विखे पाटलांच ‘आगे क्या होता है देखना पडेगा’, अशी खोचक टीका केली आहे. यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते … Read more

सनी लिओनी आता येतेय मराठी चित्रपटात !

मुंबई :- बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यास येत आहे. बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला मै लैला’ या आयटम साँगवर थिरकणारी सनी आता मराठी प्रेक्षकांनाही तिच्या अदांनी घायाळ करणार आहे. आगामी ‘बॉईझ्’ या चित्रपटात ती आयटम साँगवर डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत … Read more

श्रीरामपूर शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न

श्रीरामपूर :- जनतेच्या हिताचा विचार करून विकासकामे करत असून शहराचा कायापालट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले. प्रभाग १६ मधील आजी-आजोबा विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करताना आदिक बोलत होत्या. या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य नगरसेविका स्नेहल खोरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, उमेश अनकईकर, अर्जुनराव भांड आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष आदिक म्हणाल्या, … Read more

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नॉनव्हेज’न बनविल्याने पती-पत्नीत भांडण !

अहमदनगर :– घरात नॉन व्हेज का बनविले नाही असे म्हणत पतीने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने पोलिसात दाखल केली आहे. सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील पोलीस चौकीसमोेर ही घटना घडली. पत्नीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी बाळासाहेब महादेव लोखंडे (साईकुंज अपार्टमेंट, गुलमोहर रस्ता) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. कर्जत तालुक्यातील लिंबगाववाडी येथील रहिवासी असलेले लोखंडे कुटुंब सध्या नगरमध्ये वास्तव्यास आहे. बाळासाहेब … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा नाकर्तेपणा….शाळे साठी निधी मागायला गेलेल्या दिपाली सय्यद यांना दिले हे उत्तर…

श्रीगोंदा :- शाळेसाठी निधी मागण्यास आलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद सह शिष्टमंडळास पालकमंत्री राम शिंदे यांनी नकार देत स्वताची जबाबदारी नाकारत चक्क दुसरा पर्याय सांगितला. तालुक्यातील शेडगाव येथील शाळेतील वर्ग भरविण्या योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षणाचेधडे गिरविण्याची वेळ आली आहे. इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, या मागणीसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शेडगाव येथील एक … Read more

अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी तब्बल दोन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला. आनंदा रामा दुणगे (२१, राहणार वाडेगव्हाण, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीचा शोध … Read more

मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाच्या तोंडात ओतले विष!

अहमदनगर :- मुलीसोबत भांडण केल्याच्या रागातून सासूने जावयाला आणखी एका महिलेच्या मदतीने मारहाण करून तोंडात विष ओतले. नवनागापूर येथील पितळे कॉलनीत 8 जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.22) रात्री उशिरा सासूसह एका महिलेविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला . मंगल आव्हाड (रा. पितळे कॉलनी, नागापूर) असे आरोपी सासूबाईचे नाव असून मनिषा … Read more

माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांना अटक

नेवासा: निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे याला शहर पोलिसांनी अटक केली. शिवसेनेचा उपतालुका प्रमुख बिट्टू वायकर याला दिल्ली येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच पोलिसांना सूत्रधाराविषयी माहिती दिली. आरोपी वाकचौरे याला … Read more

राज्य साखर संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व घनशाम शेलार यांची निवड

श्रीगोंदा :- राज्यातील  सहकारी साखर  कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांचीही संचालकपदी वर्णी लागली आहे.  निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व संचालक स्व.माजी खासदार अंकुशराव टोपे … Read more

श्रीगोद्याच्या आजी माजी आमदारांनी शेतकऱ्यांना फसवले, उसाच्या पैशांसाठी निवासस्थानासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

श्रीगोंदा :- तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड व साईकृपा शुगर अँड अलाईड लिमिटेड(हिरडगाव)या साखर कारखान्याकडे श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकर्‍यांची ऊसाची थकलेली बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड ने माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या आणि आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन सोमवारी बेमुदत ठिय्या ठोकत, चूल पेटवून आंदोलन सुरू केले आहे. श्रीगोंदा … Read more

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने हत्या !

कोपरगाव : तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणीच्या भावाने दाखल फिर्यादीनुसार आरोपी पतीच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा … Read more

राज्यात पुन्हा भगवाच फडकणार – आदित्य ठाकरे

संगमनेर :- आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संगमनेर मध्ये बोलताना व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे रविवारी संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. घारगाव येथे आदित्य यांनी शेतात जाऊन ज्वारीची पेरणीही केली. ‘जनतेच्या अनेक प्रश्नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही … Read more

शेवगावात वीज कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

शेवगाव :- तालुक्यातील खामगाव येथील शुभांगी राजू शिंदे (वय – 14 ) या शालेय विद्यार्थिनीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी दि.21 रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास घडली. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे शुभांगी आई व बहिणीसोबत शेतात कपाशी खुरपणी करत होती. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे मायलेकी घराकडे आडोशाला जात असताना वीज कडाडून … Read more

आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दी सारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत…

संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत. ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला. आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. थोरात यांच्या … Read more

धक्कादायक : पोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी

अहमदनगर :- पोलिस कर्मचाऱ्यानेच युवतीला घरात कोंडून मारहाण करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पोलिस कर्मचारी योगेश धाईंजे व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धाईंजे हा एका महिन्यापासून पीडित युवतीचा पाठपुरावा करत … Read more

७६० लिटर बनावट ताडी जप्त

जामखेड: नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात तपनेश्वर गल्ली महादेव मंदिराजवळ नेवाळवाडी येथे राहणा-या आरोपीच्या घरात व गाडीमध्ये १०- २०लिटर नव्हे तर तब्बल ७६० लिटर मेसळीची ताडी पोलिसांनी पकडली. या  ठिकाणाहून पोलिसांनी एक व्हॅगनर गाडी नं. एमएच ०४,  बीएस २४५३ हिच्यातही ताडी  पकडली. याप्रकरणी पोको शाम सुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विरेशम अजुन कोरकोपला, वय ५०, रा. … Read more

चापट का मारली? विचारणाऱ्या वर कोयता, चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

नगर: नगर शहरात कबाड गल्लीत पंचपीर चावडी, माळीवाडा परिसर येथे राहणारे वाहिद मेहबुब शेख उर्फ लाला कुरेशी, वय ३६ यांचा पुतण्या अम्मार याला आरोपींनी लहान मुलाच्या भांडणावरुन चापट मारली. तेव्हा वाहिद शेख उर्फ कुरेशी हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. चापट का मारली? असे विचारल्यावरुन पाच आरोपींनी याचा विषय संपून टाकू, असे म्हणत धारदार चाकू व … Read more