आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘त्या’ डॉक्टरला खडसावले

राहुरी :- अपघातात ठार झालेल्या तरुणाच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना तब्बल १० तासांहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागल्याने ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. तालुक्यातील म्हैसगाव येथील सुरेश श्रीरंग नेहे (वय ३५) यांचा मंगळवारी रात्री १० च्या सुमारास म्हैसगाव-राहुरी मार्गावरील केदारेश्वर घाटात अपघात होऊन ते ठार झाले. नेहे यांचा मृतदेह रात्री पावणेअकरा वाजता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात … Read more

विवाहितेच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लिल वर्तन

अहमदनगर :- घरात झाेपलेल्या विवाहितेच्या घरात जाऊन तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याची घटना स्टेशन रस्त्यावरील कोठी परिसरात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आकाश मनोज पोळ (२२, कोठी परिसर) याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कोठे वाच्यता केल्यास मारहाण करण्याची धमकी आरोपीने महिलेला दिली. या प्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास सोनार करत … Read more

विवाहितेचा विनयभंग,नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी

अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

उड्डाणपुलाचे काम महिन्याभरात सुरू !

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिनाभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी मािहती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डाॅ. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. याबाबत … Read more

नगरमध्ये ट्रक व एसटी बसच्या भीषण अपघातात बस जळून खाक, 28 प्रवाशी जखमी

अहमदनगर :- नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांना निवडून आणण्याची जबाबदारी खा. सुजय विखेंकडे !

अहमदनगर :- विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. अनेकांना वाटते की आपण प्रयत्न करावेत, यासाठी गोरगरीब जनतेसाठी काही कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याला मोठी प्रसिध्दी मिळत आहे. मात्र राम शिंदे यांनी त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने गोरगरीबांचे कामे गेल्या पाच वर्षांमध्ये केली आहेत, अशी पवार यांचे नाव न घेता श्री विखे यांनी टीका केली. पालकमंत्री राम शिंदे … Read more

गुंडावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

नगर – केडगाव परिसरात तडीपार गुंडावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील हत्त्यार व वाहन जप्त करण्यात आले आहे. त्याना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. आरोपी सुनील सातपुते, निलेश भालसींग, महेश साके यांना ताब्यात घेतले आहे.  गेल्या आठा दिवसापूर्वी दोन गटात राजकीय वादातून केडगावात पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोडवरील हॉलीबॉल … Read more

डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप एकाच व्यासपीठावर!

अहमदनगर – परस्परांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणारे डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप शनिवारी एकाच व्यासपीठावर दिसले. महापालिका निवडणूक एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोघे लोकसभा निवडणूक विरोधात लढले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच हे दोघे एका व्यासपीठावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.   महापालिकेच्या घरकुलांची सोडत दोघांच्या हस्ते काढण्यात आली. लोकसभा निवडणूक प्रचारात एकमेकांच्या विरोधात … Read more

मुख्याध्यापकाची विष प्राशन करून आत्महत्या

राहाता :- तालुक्यातील खडकेवाके येथील cकरण्यासाठी काही दिवसांपूर्वी विषारी पदार्थ सेवन केला होता. उपचार चालू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला. ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे झाली याचे गूढ मात्र गुलदस्त्यात आहे. भास्कर बाजीराव यादव हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवरा एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते एकरुखे येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून काम … Read more

वृद्ध विधवा महिलेवर भर दिवसा अत्याचार

कर्जत :- तालुक्यात राक्षसवाडी खुर्द येथील विधवा वृध्द महिलेवर भर दिवसा अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी दिवसभर सर्व दुकाने बंद ठेवली. तसेच गावामध्ये एकही घरामध्ये चूल पेटली नाही. या घटनेतील आरोपीस तातडीने अटक करून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संतत्प ग्रामस्थानी कर्जतचे पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन केली आहे. … Read more

मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीस जीवदान

अहमदनगर :- निर्जनस्थळी असलेल्या विहिरीत पडलेल्या तरुणीने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी तरुणीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता परिसरात ही घटना घडली. संबंधित तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.  तपोवन रस्ता परिसरात निर्जनस्थळी असलेल्या एका विहिरीत ही तरुणी आढळून आली. विहिरीत जास्त पाणी नसल्याने … Read more

कुत्रा चावला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर :- पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी चक्क कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्याविषयी हयगय केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भिस्तबाग चाैकातील पवननगरमध्ये २ जूलैला ही घटना घडली. याप्रकरणी विजय अर्जुन पिंगळे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. विजय पिंगळे यांची पुतणी दुर्गा संजय पिंगळे हिला रॉट व्हिलर जातीच्या कुत्र्याने चावा घेतला. हा … Read more

पत्रकार गणेश शेंडगे प्रथम श्रेणीत ‘एलएल.एम.’ उत्तीर्ण

अहमदनगर – दै. ‘पुढारी’च्या अहमदनगर आवृत्तीचे उपसंपादक तथा क्राईम रिपोर्टर गणेश मारुती शेंडगे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएल.एम. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी वाणिज्य कायद्यात विधी शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात त्यांनी ‘मोटार वाहन कायद्यातील नुकसान भरपाई संबंधी’च्या विषयात प्रबंध सादर केला होता. त्यांनी यापूर्वी बी.एस.एल. एलएल.बी., बी.जे. … Read more

विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

अहमदनगर :- विवाहबाह्य संबंधाला विरोध करीत असल्याच्या कारणातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. कैलास आनंदा नरके (वय ४२, कासारी, शिरुर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम. आर. जगताप यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. आरोपी नरके याने पत्नी सविता हिला घरातून … Read more

दोन ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू.

राहुरी :- नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून दुसरा ट्रक धडकला. या अपघातात एकजण ठार झाला. शुक्रवारी पहाटे ३ दरम्यान नगर-मनमाड मार्गावरील गुहा परिसरात हा अपघात झाला. मृताचे नाव सुनील दत्तू हलवर (२६, घोडेगाव चौकी, मालेगाव) आहे. हलवार ट्रकमध्ये मालेगाव येथून कोंबडी खाद्य घेऊन नगरच्या दिशेला चालले होते. गुहा परिसरातील कृष्णा हाॅटेलजवळ ट्रकचा टायर फुटल्याने मदतीसाठी दुसऱ्या ट्रकची … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणतात माझीच उमेदवारी फायनल !

नेवासे :- पक्षाच्या सर्वेक्षणानुसार माझी उमेदवारी नक्की आहे. मला उमेदवारी देऊ नका म्हणणारे विरोधकांचे हस्तक आहेत. भाजप हा जनमतावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याने गडाखांनी माझ्या उमेदवारीत कितीही अडथळे आणले, तरी त्यांचे मनसुबे टिकणार नाहीत, असे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शुक्रवारी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील राजकीय हलचालींना वेग आला असून राजकीय डाव-प्रतिडाव खेळले … Read more

नगर शहरात आजपासून धावणार ‘शिवनगरी’

नगर :- शहर बससेवेची वर्षभरापासून असलेली प्रतीक्षा शनिवारी (६ जुलै) संपणार आहे. दीपाली ट्रान्स्पोर्ट या संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘शिवनगरी’ बसगाड्या शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत. सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या सेवेला सुरुवात होणार आहे. शहरात वर्षभरापासून नगर शहर बससेवा उपलब्ध नसल्याने नगरकरांची गैरसोय झाली. शहरातील नागरिकांना खासगी अवैध वाहतुकीतून प्रवास करण्याशिवाय … Read more

नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील बेरोजगारांसाठी नोकरी मेळावा

पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील बेरोजगारांसाठी १४ जुलैला सुपे येथील सफलता मंगल कार्यालयात नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ८ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओटोमोबाईल, फायनान्स, बँकिंग, सिक्युरिटी, हॉस्पिटल, विमा, आयटी आदी क्षेत्रांतील ७५ मल्टीनॅशनल कंपन्यांशी … Read more