आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाणार !

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेऊन दिला. त्यांच्याऐवजी इतर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची आग्रही मागणी केली गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा … Read more

शिर्डीतून भर दिवसा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

शिर्डी –  भरदिवसा दोन सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलींना अज्ञात आरोपीने ५ च्या सुमारास अज्ञात कारणासाठी कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.  सदर घटना शिडी परिसरातील मिनाक्षी मार्केट भागात घडली असून  काही दिवसांपासून शिर्डीत अशा घटना घडत असून पालक वर्गात खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी  शिडी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

आ.राहुल जगताप यांच्या कमी अभ्यासामुळे जनता मेटाकुटीला !

श्रीगोंदे :- आमदार राहुल जगताप यांनी पावसाळी अधिवेशनात साकळाईबाबत लक्ष्यवेधी सूचना मांडली, परंतु ही सूचना साकळाईचा गळा घोटण्यासाठीच होती. पाच वर्षे आमदार असताना शेवटच्या अधिवेशनात लक्ष्यवेधी का मांडली, असा सवाल पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोतम लगड यांनी बुधवारी केला. मुळात कुकडी प्रकल्पात पाणी कमी आहे. त्याकरिता आधी कुकडी प्रकल्पातील पाणी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी डिंभे … Read more

शहर बससेवा अखेर रविवारपासून होणार सुरू !

अहमदनगर :- गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शहर बससेवा अखेर येत्या रविवारपासून (७ जुलै) सुरू होणार आहे. पूर्ण क्षमतेने सुरू होणाऱ्या दीपाली ट्रान्सपोर्टच्या शहर बसवाहतूक सेवेचे तिकीट दर जुनेच असणार आहेत. कमीत कमी ५ रुपयांपासून २० रुपयांपर्यंतचे हे दर आहेत. यामुळे प्रवासी रिक्षांद्वारे नगरकरांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा बसणार आहे. तसेच या नव्या बससेवेद्वारे सुरुवातीला … Read more

ह्या कारणामुळे रोहित पवार लढविणार कर्जत – जामखेड मधून निवडणूक…

अहमदनगर :- राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबत त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकत या निर्णया मागील कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे. याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. … Read more

राष्ट्रवादीकडून छावणीचे बिल देण्याची मागणी

नगर :- शासनाने चारा छावणी चालू ठेवण्याबाबत जो निर्णय घेतलेला आहे त्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी छावणी चालकांचे बाकी असलेले बिल दोन ते तीन दिवसांत अदा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी नगर श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दादा … Read more

मैत्री, प्रेम, अत्याचार ते सोशल मीडियात बदनामी करत दहा लाखांची खंडणी…हि घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल…

अहमदनगर :- पंधरा दिवसांपूर्वीच तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् त्या दोघांची गृहस्थाश्रम वाटचाल सुरू झाली. दोघांच्या सुखी संसारात जुना मित्र प्रकटला. त्याने तिच्या मिस्टरांकडे दहा लाखांची खंडणी मागत त्याने संसाराच्या वाटेत काटे टाकले. आता हा वाद थेट पोलिसांच्या दारात पोहोचला असून पोलिस त्या ‘मित्राच्या शोधात आहेत. कोण्या पिक्चरमधील ही कहाणी नाही तर ही नगरात घडलेली … Read more

मी केलेला विकास पहायचा असेल तर मतदारसंघात येऊन पहा – आ. शिवाजी कर्डिले

राहुरी :- आपले शिक्षण कमी असले, तरी आपण फिल्डवर काम करतो, त्यामुळे जनतेचे प्रश्न काय आहेत, ते शासन दरबारी कसे मांडायचे आणि मंजूर करून घ्यायची हातोटी आपल्याकडे आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक निधी राहुरी – नगर – पाथर्डी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आणला आहे. आपण केलेला विकास कोणाला पहायचा असेल, तर या मतदारसंघात येऊन पहा, असे … Read more

सेनेत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो : राठोड

अहमदनगर :- शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पावती या पदाच्या माध्यमातून मिळत आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे. कारण शिवसेनाच सर्वसामान्यांना जवळची वाटत असल्याने शिवसैनिकांनी त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. विजय सानप … Read more

मुळा जलाशयात ४२ वर्षांच्या महिलेची आत्महत्या

राहुरी :- मुळा धरणावर नव्याने सुरू झालेल्या मत्स्यपालन केंद्राजवळील पाण्यात ४२ वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली. या घटनेमुळे मुळा धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. ही महिला राहुरीच्या करपे इस्टेट येथील सविता देठे असल्याचे समजते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचेे कारण समजले नाही. मंगळवारी दुपारी सव्वाच्या सुमारास मुळा धरणावरील नगर एमआयडीसी उपसा केंद्राच्या … Read more

जमीन विकल्याच्या कारणातून हत्या!

संगमनेर – जमीन विकल्याच्या कारणातून भाऊबंद नातेवाईकांनी संदीप रमेश ठोंबरे , वय ३५, रा. पिंपरणे, ता. संगमनेर याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना काल पिंपरणे गावच्या शिवारात घराजवळील रस्त्यावर घडली. या प्रकरणी मयत संदीप रमेश ठोंबरे यांच्या पत्नी दीपाली संदीप ठोंबरे वय २५ रा. पिंपरणे शिवार यांनी काल संगमनेर तालुका पोलिसांत … Read more

जुन्या भांडणातून कोयत्याने डोक्यात वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

शिर्डी – राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कदम चहाच्या टपरीजवळ काल सायंकाळी ६ च्या सुमारास प्रदीप बळीराम गायकवाड, वय २६, धंदा नोकरी, रा. सावळीविहीर, ता. राहाता, मागील भांडणाच्या कारणावरुन ६ जणांनी जमाव जमवून कोयत्याने डोक्यात वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशांत गायकवाड याच्याही हातावर कोयत्याने वार करुन मारहाण केली. लाकडी दांड्याने पाठीवर बेदम … Read more

शाळेतून घरी जात असताना विद्यार्थिनीचा हात धरुन विनयभंग

संगमनेर :- तालुक्यातील रायतेवाड़ी परिसरात काल दुपारी १२. ३० च्या सुमारास एक साडेचौदा वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी आधार कार्ड आणण्यासाठी शाळेतून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपी राजू मोरे (रा. रहिमपूर, संगमनेर) याने विद्यार्थिनीचा हात धरुन विनयभंग केला. विद्यार्थिनीने जोरजोराने आरडा ओरड केल्याने दुचाकी टाकून राजू मोरे पळाला याच आरोपीने आठ दिवसापूर्वी एका १२ वर्षाच्या विद्यार्थिनीची … Read more

थोरात महाविद्यालयात राडा !

संगमनेर : शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकास मारहाण झाल्याची घटना सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोरक्षनाथ नामदेव पानसरे हे थोरात महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पानसरे, … Read more

केडगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तडीपार गुंडावर खुनी हल्ला

अहमदनगर – तडीपार असतानाही केडगावमध्ये फिरणारा गुंड मनोज कराळे व शिवसेना शिवसेना कार्यकर्ता सुनील सातपुते यांच्यात सोमवारी (दि.1) रात्री हाणामारी झाली. तडीपार कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला केला, असे जखमी कराळे याचे म्हणणे आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ला प्रकरणी … Read more

विहिरीवरील क्रेन तुटून महिलेचा मृत्यू

श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती. शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या … Read more

महिलांच्या शौचालयात डोकावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

राहुरी :- एसटी बसस्थानकावरील शौचालयात गेलेल्या प्रवासी महिलेकडे खिडकीतून डोकावून पाहणाऱ्या अरबाज शेख (राहुरी) या तरूणाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंंबई येथील ही महिला बसस्थानकावरील शौचालयात गेल्यानंतर पाठीमागच्या खिडकीतून अरबाज शेख हा मोबाइल हातात घेऊन डोकावत असल्याचे दिसले. या महिलेने बाहेर येऊन अन्य प्रवाशांना हा प्रकार सांगताच त्यांनी संबंधित तरूणाला रंगेहात पकडून लाथाबुक्क्यांनी तुडवत चोप … Read more

मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करून शोषण

राहुरी :- मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार करून शोषण केल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपी मुजफ्फर लतीफ शेख व त्याची चुलती गुलशन रशीद शेख यांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. दोन वर्षांपूर्वी मुजफ्फर लतीफ शेख याने राहत्या घरातून युवतीचे अपहरण करत गुलशन रशीद शेख हिच्या घरात तिले डांबून ठेवले … Read more