राधाकृष्ण विखें पाटलांचे मंत्रीपद धोक्यात

मुंबई :- नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात १३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यातील काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रिपदाला सतीश तळेकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांना दिलेले मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचा दावा याचिकेत केला आहे. १३ नव्या मंत्र्यांत तिघे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. विखे, क्षीरसागरांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर, महातेकर कोणत्याच … Read more

नगर विकास मंचाच्या निमंत्रक पदी किरण काळे यांची निवड

अहमदनगर : शहरातील जागरूक नागरिक व युवकांनी एकत्रित येऊन नुकतीच नगर विकास मंचाची स्थापना केली आहे. या मंचाच्या निमंत्रकपदी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा मंचाच्या सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. मंचाच्या वतीने शहरात आगामी काळात विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. शहरातील महिला, युवा वर्ग, नोकरदार, … Read more

जुन्या वादातून दोन गटांत दंगल, विनयभंग व मारहाणीचे गुन्हे दाखल

जामखेड –  तालुक्यातील खुरदैठण गावात जुन्या वादातून दोन गटांत उसळलेल्या दंगलीत दोन जण जखमी होण्याची 15 रोजी घटना घडली होती. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एका गटातील बारा जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तर दुसर्या गटातील चार जणांविरोधात विनयभंग व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही फिर्यादीनुसार तब्बल सोळा … Read more

मनपा स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांना अटक

अहमदनगर : सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनपा स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांना काल सायंकाळी अटक करण्यात आली आहे. सर्जेपुरा परिसरात आरिफ शेख व मुदस्सर शेख यांच्या दोन गटांमध्ये महापालिका निवडणूक वादातून हाणामारी झाली होती. या गुन्ह्यात मुदस्सर शेख यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शेख फरार होते. काल … Read more

नगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर कारमध्ये बलात्कार

नगर – नगर शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ करत प्रेमसंबंध निर्माण करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवर संशय घेवून पोलो कारमध्ये बसवून दिल्ली गेट भागात कारमध्ये वेळोवेळी बलात्कार करून मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  शुभम ज्ञानदेव सुडके, रा. नालेगाव, नगर असे आरोपीचे नाव आहे.  पिडीत अल्पवयीन … Read more

पोलिसाचे अपहरण करून मारहाण ; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक

अहमदनगर: पोलीस कर्मचा-याला अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्र्यंबके याला आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. नगरसेवक सुनील त्र्यंबके हा महिन्याभरापासून पसार होता. पाईपलाईन रोड येथून नागसेवक त्र्यंबके याला अटक केली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई … Read more

श्रीगोंद्यातील बारावीच्या विद्यार्थ्याची प्रेमप्रकरणातून आत्महत्या,सात जणांवर गुन्हा

श्रीगोंदा :- बारावीच्या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि ८ एप्रिल रोजी तालुक्यातील बांगर्डा येथील १ विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. तब्बल दोन महिन्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजित संजय गायकवाड (वय १९) … Read more

लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणी महालक्ष्मी’ अध्यक्षासह १६ जणांवर गुन्हा

अहमदनगर :- ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अखेर नगरच्या श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को-आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेला नगरमधील ठेवीदार सुनील व्यंकटेश देशपांडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सोसायटीच्या चेअरमन हेमा सुरेश सुपेकर, व्हाइस चेअरमन अशोक गंगाधर गायकवाड, संचालक राहुल अरुण दामले, राजेंद्र सुखलाल पारख, … Read more

विखे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर संगमनेरमध्ये जल्लोष

संगमनेर :- राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे यांची वर्णी लागताच विखे समर्थक आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांच्या निवडीचे रविवारी स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडी, त्यानंतर विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील वाढता संघर्ष, विरोधी पक्षनेते आणि आमदारकीचा दिलेला राजीनामा, भाजप प्रवेश अशा घडामोडीत विखे राज्यात केंद्रस्थानी होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उघडपणे … Read more

जनतेने वेळीच ‘त्यांचा’ बंदोबस्त करा : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर :- तालुक्याचे राजकारण अतिशय सरळ आहे. मी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही. मात्र, बुध्दिभेद करणारे काही लोक येथे येत आहेत. त्यांचा जनतेने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. तालुक्याच्या विकासाठी सर्वांनी एकत्रित राहायला हवे. निळवंडे धरणाच्या कामात ज्यांचे कधीही योगदान नव्हते असे लोक आता श्रेयासाठी सरसावले आहेत. धरणावरुन राजकारण सुरु झाले आहे, असे काँग्रेसचे नेते आमदार … Read more

सासरच्या लोकांनी माहेरच्या लोकांना मारले

कोपरगाव ;- तालुक्यातील पोहेगाव परिसरात राहणारे बाबासाहेब चंदर भोजणे, वय ४२, धंदा शेती यांना त्यांची मुलगी उषा संतोष वायकर, रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव तिच्या सासरच्या लोकांनी जमाव जमवून घरात घुसून बेदम मारहाण केली. या मारहाणीत बाबासाहेब भोजणे यांची आई, मुलगी उषा संपत वायकर, भाऊ सुखदेव चंदन भोजणे, कांताबाई सुखदेव भोजणे, सर्व रा. पोहेगाव हे जखमी … Read more

राधाकृष्ण विखेंच्या स्वप्नांवर पाणी !

अहमदनगर :- दिल्लीतून मंत्रीपदासाठी सिग्नल मिळत नसल्याने काँग्रेस सोडणारे राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. थेट दिल्ल्लीतूनच विरोध झाल्याने भाजप सरकार मध्ये मंत्रीपदाचे स्वप्न पहाणार्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वप्नावर तूर्तास तर पाणी पडले आहे. लोकसभेच्या निकालानंतर माजी विरोधी पक्षनेते विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असतानाच … Read more

दुचाकी चोरीच्या पैशातून गोव्याला जाऊन एन्जॉय करणारी टोळी गजाआड

अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.  ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे. पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 … Read more

आमदार मुरकुटे यांच्या अडचणींत वाढ !

नेवासे :- विधानसभेच्या नेवासे मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच पक्षाच्या राज्य पातळीवरील एका वरिष्ठ नेत्याने तालुक्यातील शिक्षणसम्राट आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांच्याकडे चाचपणी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि घाडगे यांच्यातील संघर्ष … Read more

खासदार सुजय विखेंच्या ‘या’ कृत्यामुळे जिल्हापरिषदेत नाराजी

अहमदनगर :- नगर दक्षिणेतून निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगेच कामाचा तडाखा सुरू केला आहे. परंतु कामे करतांना मात्र त्यांनी राजशिष्टाचाराला अक्षरशः हरताळच फासल्याचा प्रचार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरुवारी खा.सुजय विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. … Read more

मोठी बातमी: बाळासाहेब थोरातांची कॉंगेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

मुंबई: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे कट्टर विरोधक असलेले विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी व उपनेतेपदी नसीम खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.  … Read more

रस्त्याच्या कारणातून तलवारीने मारहाण

राहुरी :- तालुक्यातील चिंचोली येथे राहणाऱ्या शेतकरी बाबासाहेब भोसले यांचा मुलगा किशोर बाबासाहेब भोसले तसेच किशोर भोसले याची आई व बहिण या चौघांना शेतातील रस्त्याने येण्या-जाण्याच्या कारणावरुन तलवार, लोखंडी गज लोखंडी दांडा, लोखंडी पाईपने घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. जखमी किशोर बाबासाहेब भोसले या विध्यार्थ्याने काल राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी अशोक … Read more

लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

संगमनेर :- तालुक्यातील एका तीस वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मनोज वसंत कांगणे (रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अत्याचाराच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील आरोपी मनोज वसंत कांगणे याने २५ मार्च २०१८ ते १ मे २०१९ या … Read more