आ. संग्राम जगताप यांचा फलक चोरीला !

अहमदनगर :- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेता सुभाष चौकात लावलेला स्वागताचा फलक चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. हा चौक शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचा बालेकिल्ला मानला जात असून आगामी काळात आ. जगताप-उपनेते राठोड यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. आ. संग्राम जगताप यांनी कोतवाली पोलीस … Read more

भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिल्यास निवडून आणू !

नेवासे :- माजी खासदार दिलीप गांधी यांनी नेवाशातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळाव्यात कार्याकर्त्यानी धरला. भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी यावेळी व्यक्त केला. मंगळवारी अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपचे व खासदार गांधी यांना मानणारे … Read more

श्रीगोंद्यात सामाजिक कार्यकर्त्याचा गळ्याला फास अडकवलेला मृतदेह आढळला

श्रीगोंदे :- तालुक्यातील पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे (२६) या तरुणाचा गळ्याला फास अडकवलेल्या स्थितीतील मृतदेह देऊळगावच्या हद्दीत शुक्रवारी आढळला. दरम्यान मृत्यूपूर्वी त्याने गावातील एक ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार श्रीगोंदे पोलिसांत दिली होती. या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे हा तरुण खासगी वाहनावर चालक … Read more

मोलमजुरी करणाऱ्या एकाचा मृतदेह विहिरीत आढळला

राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या अर्जुन पाचे (वय ५२) याचा मृतदेह मोकळ ओहोळ येथील कदम यांच्या विहिरीत गुरुवारी आढळला. काॅन्स्टेबल शैलेश सरोदे, सुशांत दिवटे, रोहित पालवे यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दुपारी वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहेत. वीस … Read more

पालकमंत्री राम शिंदेंच्या शब्दाला कार्यकर्त्यांनी दाखवली केराची टोपली !

जामखेड :- नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणुकीसाठी अर्जांच्या छाननीत सातपैकी एबी फार्म नसल्याने एक अर्ज बाद झाला. भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांची भर पडल्याने लढत रंगतदार होणार आहे. सुरुवातीला भाजपतर्फे पठाण सलमा शाकीरखान यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु पक्षाचा एबी फार्म पठाणऐवजी शेख जाकीया आयुब … Read more

राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर, मंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण

अहमदनगर :- राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे,तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे संभाव्य मंत्री पदाबाबत ही संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करुन, पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे. … Read more

पाण्याच्या वादातून महिलेने तोडला महिलेचा कान

राहुरी : यंदा दुष्काळाने सर्वत्रच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर सुरू आहेत, तर काही ठिकाणी विहिरी, विंधनविहिरींचा आधार घेतला जात आहे. मिळेल तेथून पाणी आणून तृष्णा भागविली जात असताना काही ठिकाणी वादाच्या ठिणग्याही पडत आहेत. मात्र, राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेचा कान तुटल्याने एकच खळबळ … Read more

श्रीसाई संस्थानकडून भाविकांसह शिर्डीकरांची फसवणूक !

शिर्डी :- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने गेल्या तीन वर्षांत शिर्डीच्या विकासासाठी केलेल्या घोषणांची किती पूर्तता झाली, साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने मंजूर केलेल्या ३२०० कोटींच्या विकास आराखड्यातील किती कामे मार्गी लावली, याचा लेखाजोखा असलेली श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी, अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते व उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी गुरुवारी केली.  दानाचा वापर … Read more

सख्या तीन चुलत भावांचा बुडून मृत्यू

पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी … Read more

तिची वाट पाहता पाहता….

१ जून रोजी महामंडळाच्या लाल परीचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त एसटी सोबतच्या कडूगोड आठवणींना उजाळा देण्याचं ठरलं.. त्यातील पहिला भाग तुमच्यासाठी.. प्रथम एसटी ची गाठ पडली मी अगदी लहान असताना मामाच्या गावाला आईसोबत जायचो तेव्हा. तेव्हापासून ते २०१७ पर्यंत म्हणजे मी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असेपर्यंत लालपरीशी खूप जवळचं नातं एकदम फेविकॉल च्या जोडासारखं राहीलं. … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेवून बलात्कार

नगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पारनेर तालुक्यातील धोत्रे परिसरातून एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. तिला नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शिवारातील के कताई डोंगरामध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध करून बलात्कार केला.  ३१ मे ते २ जून २०१९ या काळात हा अत्याचाराचा प्रकार घडला, पिडीत मुलीच्या आईने … Read more

किरणच्या खूनप्रकरणी दोघांना पुण्यातून अटक

अहमदनगर :- नगर शहरातील बसस्थानकासमोर बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय 26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा. खिस्त गल्ली, नगर) ही अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 29 एप्रिल … Read more

लग्नाला घरच्यांचा विरोध, प्रेमीयुगुलाने घेतला गळफास मुलीचा मृत्यू, मुलावर उपचार

अहमदनगर :- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला, तर मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अवंतिका रघुनाथ दळवी (२१, कडा, ता. आष्टी) असे मृत युवतीचे नाव असून, मुकुंद बाबासाहेब भोजने या तरुणावर उपचार सुरू आहेत. या … Read more

रोहित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादीतील राजकारण तापणार

जामखेड :- आगामी काळात कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाचा रोहित पवार यांना विरोध असून एका गटाचा पवारांशिवाय पर्याय नसल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या ठिकाणी पवार यांच्याऐवजी स्थानिकांना संधी मिळावी, असा राष्ट्रवादीच्या एका … Read more

पबजी गेमच्या नादात नगर जिल्ह्यातील तरूणाची आत्महत्या !

राहुरी ;- तालुक्यात ईदच्या दिवशी गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फारूक मन्सूर इनामदार (वय २०, आंबी) असे या युवकाचे नाव असून आंबी शिवारातील प्रवरा नदीपात्रात झाडाला दोर बांधून त्याने गळफास घेतला.  दुपारी नातेवाईकांनी पाहिल्यावर आरडाओरडा करून इतरांना बोलावून घेतले. मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.  … Read more

कचरा डेपो आग प्रकरणी, डॉ.पैठणकर अखेर निलंबित

अहमदनगर – सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर यांना रात्री उशीरा निलंबित केले आहे. दरम्यान तसा जिल्हाधिका-यांनी कारवाईचा प्रस्ताव मंजूर प्रस्ताव केला आहे. हा प्रस्ताव उपायुक्त सुनील पवार यांच्याकडे पाठविला आहे. डॉ. पैठणकर हे अनेक कारणांमुळे मनपा प्रशासनाच्या व जिल्हाधिकार्यांच्या नजरेत होते. त्यांचा मनपातील ठिसूळ कारभार, … Read more

‘प्रेम’च्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त, नगरमध्ये तणाव

अहमदनगर :- किरकोळ कारणातून महिनाभरापूर्वी बसस्थानकासमोर मारहाण करण्यात आलेला तरुण प्रेम जगताप (वय २५, रा. स्टेशन रोड) याचा उपचारादरम्यान मंगळवारी (४ जून) मृत्यू झाला.  प्रेमच्या नातेवाईकांनीही याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करावी , तसेच आरोपीना अटक करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास … Read more

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील…

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले. जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. … Read more