अहिल्यानगर शहरातील ह्या दोन रस्त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नामकरण संपन्न

अहिल्यानगर दमहानगरपालिका हद्दीतील डॉ.ना. ज. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एस.टी.डी पर्यंत मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील भगवानबाबा अपार्टमेंट ते रोहन रेसिन्डेन्सी या अंतर्गत रस्त्याचे स्व. रुख्मीणीबाई काळे आज्जी मार्ग नामकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार संग्राम जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी … Read more

Ahilyanagar News : हातात तलवार अन चोऱ्या.. अहिल्यानगरमधील ‘या’ गावात चोरट्यांचा नंगानाच

Ahilyanagar News : नेवासाखुर्द येथे एका घराच्या कंपाउंडमधून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच याच ठिकाणी जवळील एका दुकानातही चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्ही तपासणी केली असता चोरटे यात कैद झाले आहेत. धक्कादायक म्हणजे चोरट्यांच्या हातात तलवार दिसून येत आहेत. अधिक माहिती अशी : नेवासाखुर्द येथील पावन गणपती मंदिरासमोर … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : IPS Sudhakar Pathare यांचा भीषण अपघातात मृत्यू ! महाराष्ट्राच्या पोलीस दलाला मोठा धक्का

IPS Sudhakar Pathare : तेलंगणात महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे आणि त्यांचा भाऊ भागवत खोडके यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हा अपघात तेलंगणातील श्रीशैलम घाट परिसरात झाला, जिथे ते दोघेही श्रीशैलम ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात होते. या दुर्घटनेत त्यांच्या कारला बसने जोरदार धडक दिली, ज्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे महाराष्ट्र पोलीस … Read more

खा. लंकेंच्या शिफारशीवरून एक दिवसांत मदत ! जखमी सतीशच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख रूपये वर्ग

विळद पिंप्री ता. नगर येथील सतिश मारूती होडगर या १५ वर्षीय मुलाच्या हातावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री सहायता निधीमधून अवघ्या एक दिवसांत एक लाख रूपयांची मदत संबंधित रूग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर लोकसभा मतदासंघातील विळद पिंपरी, ता. नगर येथील सतिश मारूती होडगर वय १५ या … Read more

बँकिंग क्षेत्रात खळबळ ! अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी महिलेस पिक विमा नुकसान भरपाई देण्याचा सेंट्रल बँकेला आदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी येथील शेतकरी सौ भारती सुनील बोठे यांना डाळिंब पिक विमा नुकसान भरपाई रक्कम रुपये ७५०००/-व तक्रारीचा खर्च रुपये दहा हजार अशी एकंदरीत रुपये ८५०००/-सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी द्यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा देवेंद्र हेंद्रे, सदस्य श्रीमती चारू विनोद डोंगरे व … Read more

नगरचं नशीब उजळणार ! विखे पाटलांचं मिशन 2029 – जलसंपदा मंत्रीपदाचा ‘स्ट्रॅटेजिक गेम’

Ahilyanagar Report : गेल्या महिन्यांत नाशिकला जागतिक कृषि महोत्सव झाला. त्या महोत्सवात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले. पश्चिम खोऱ्यात वाहून जाणारे ६५ टीएमसी पाणी, येत्या पाच वर्षांत गोदावरी खोऱ्यात वळविले जाईल, असे त्यांनी सांगितले. आता विखे यांचे हे, वक्तव्य फक्त एक घोषणा म्हणून पाहिले गेले. मात्र त्या वक्तव्यामागे नगर … Read more

सहकार चळवळीसाठी Tribhuvan Sahkari University मार्गदर्शक ठरेल- ना.विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहा यांनी त्रिभूवन सहकार विद्यापीठ स्‍थापन करण्‍याच्‍या घेतलेल्या निर्णयाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले असून, या विद्यापीठामुळे सहकार क्षेत्र विस्तारण्यासाठी पाठबळ मिळेल. विद्यापीठाच्‍या स्थापनेमुळे सहकारी संस्‍थाचा विस्‍तार, संशोधन आणि सहकार प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होवून या चळवळीला व्‍यापक स्‍वरुप मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्पष्टीकरण ! नवीन आर्थिक वर्षापासून नवीन दराने पाणीपट्टीची आकारणी होणार

AMC

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या पाणीपट्टीच्या दरात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार वाढ करण्यात आली आहे. येत्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल पासून ही नवीन वाढ लागू होऊन त्यानुसार पाणीपट्टी आकारण्यात आली आहे. अंदाजपत्रकात चालू आर्थिक वर्षाची मागणी व जुनी थकबाकी अशी एकत्रित तरतूद जमा बाजूत करावी लागते. मागील वर्षीही ती करण्यात आली होती व याही वर्षी … Read more

१५ व्हिडीओ, ८ फोटो आणि कबुली! संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. ९ डिसेंबर २०२४ रोजी घडलेल्या या घटनेत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याने अखेर पोलिसांच्या चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे. आपण आपल्या साथीदारांच्या मदतीने संतोष … Read more

Ahilyanagar Report : श्रीगोंद्याच्या राजकारणात मोठा भूकंप ! ‘भाऊ’ एकत्र? की ‘वाद’ कायम ? नवा ट्विस्ट

Ahilyanagar Report : राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, किंवा कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो… हे ऐकलंय ना..? नक्कीच ऐकलं असेल. राजकीय बातम्या, लेख, स्तंभ किंवा थेट राजकीय पुस्तकात हा डायलाँग कुठे ना कुठे दिसतोच… या वाक्याची उदाहरणं सर्वात जास्त वेळा अहिल्यानगर जिल्ह्यात दिसतात. कधी विखे- शिंदे वाद होतो. तो मिटतो. कधी भाजपचे पराभूत आमदार … Read more

Ram Shinde : कोणामुळे वाचले सभापती राम शिंदेंचे सभापतीपद ?

Ram Shinde News

विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती राम शिंदे यांच्या बाजूने विरोधी पक्षांनीच पाठिंबा दर्शवला आहे. त्यांना पदावरून हटवण्यासाठी 19 मार्च 2025 रोजी विरोधकांनी मांडलेला प्रस्ताव अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अचानक मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे विधान परिषदेत एक नवीन वातावरण निर्माण झाले असून, सभापतींच्या पदावरील त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री … Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘त्या’ पोस्टमुळे आमदार सत्यजित तांबे सोशल मीडियावर ट्रोल !

अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी संगमनेरच्या मालपाणी उद्योग समूहाचे गिरीषभाऊ मालपाणी यांची कन्या दिव्या आणि नागपूरच्या नवभारत माध्यम समूहाचे निमीषजी माहेश्वरी यांचे पुत्र राघव यांच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपस्थित राहिल्याचे नमूद केले.   त्यांनी लिहिले, “महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांसमवेत उपस्थित राहिलो. नवविवाहित … Read more

AMC News : शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

AMC News : अहिल्यानगर शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील त्यांच्या जीवनातील प्रसंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहिराती, फलक लावण्यास परवानगी दिली जात नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, या पिलरवर विनापरवाना जाहिरातबाजी करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने कठोर कारवाई करत जाहिरातबाजी करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला … Read more

दुष्काळी मातीतून झिरपणार आता आशेचं पाणी… साकळाईचं स्वप्न आता सत्यात ! विखे पाटील कुटुंबाचा ‘जल’ विजय !

Ahilyanagar Report : साकळाई योजना हा शब्द तुम्ही-आम्ही गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून तर आपले पालक ३० वर्षांपासून ऐकत आलेत. या शब्दांवर कित्येक निवडणुका लढल्या गेल्या. साकळाईच्या आश्वासनांवर कित्येकांनी सत्ताही भोगली तर कित्येकांना सत्तेतून पायउतारही व्हावे लागले. ही योजना सर्वप्रथम स्व. बाळासाहेब विखेंनी मांडली, असं सांगितलं जातं. नगर दक्षिणेचा भाग पाणीदार करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, असं स्वतः … Read more

पतसंस्था टिकवण्यासाठी धोरणात्मक पावलं उचला, आमदार काशिनाथ दाते यांची विधानसभेत मागणी

महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ चांगलीच रुजली आहे. ही सहकार चळवळ टिकवायची असेल तर राज्य सरकारने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत, असं स्पष्ट मत आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडलं. प्रत्येक पतसंस्थेला आपल्या ३० टक्के तरलता रक्कम जिल्हा सहकारी बँकेत ठेवणं बंधनकारक आहे. पण जर एखादी पतसंस्था अडचणीत आली, तर तिला जिल्हा बँकेने आधार द्यायला हवा. सध्या … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील रंगीत खरबुजांचा दुबईत स्वाद, तरुण शेतकऱ्यांनी दुष्काळावर मिळवला विजय

दुष्काळाचं सावट डोक्यावर असताना मांडवगण परिसरातील बांगर्डे गावातल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी कमाल करून दाखवली आहे. बलभीम शेळके आणि नितीन जाधव या युवा शेतकऱ्यांनी कमी पाण्यात नियोजन करत रंगीत खरबुजांची शेती फुलवली आणि ती थेट दुबईपर्यंत पोहोचवली. रमजान ईदच्या निमित्ताने या खरबुजांचा स्वाद तिथल्या लोकांना चाखायला मिळाला. बांगर्डे गावाचा पाण्याचा प्रश्न सगळ्यांनाच माहीत आहे. इथे उन्हाळ्यात … Read more

अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या ! ताक-उसाचा रस पिताना सावधान तुमचं आरोग्य धोक्यात ?

उन्हाळ्याचा तडाखा वाढलाय आणि थंड पेयांची मागणीही जोरात वाढलीय. ताक आणि उसाच्या रसाला तर नागरिकांची विशेष पसंती आहे. रस्त्यावरच्या हातगाड्यांवर लोकांची झुंबड उडताना दिसते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण घशाला थंडावा देण्यासाठी जी थंड पेयं पितोय, त्यांची कसलीच तपासणी होत नाहीये. अन्न प्रशासन तर जणू कुंभकर्णासारखी गाढ झोप घेतंय. या कार्यालयाने आजवर एकाही थंड … Read more

खंडणी न दिल्याने रेल्वे पोलिसावर बलात्काराचा खोटा गुन्हा: एक कोटीची मागणी!

श्रीरामपूर: एक कोटी रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यामुळे बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप रेल्वे पोलिस दलात कार्यरत असलेल्या ज्ञानदेव अंबादास आढाव यांनी केला आहे. त्यांनी ही तक्रार ऑनलाइन पद्धतीने रेल्वे पोलिस अधीक्षकांकडे नोंदवली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानदेव आढाव हे सध्या बेलापूर रेल्वे स्थानकावर पोलिस म्हणून काम करत आहेत. त्यांनी … Read more