ओसामा बिन लादेनला जागा नाही, मग औरंगजेबाला का ? रामगिरी महाराजांचा रोखठोक सवाल!

Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या संदर्भात महंत रामगिरी महाराज यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी औरंगजेबाला ‘आक्रांत’ संबोधून त्याच्या कबरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामगिरी महाराज यांच्या मते, औरंगजेब हा भारतीय नव्हता आणि त्याच्यासारख्या आक्रांत व्यक्तींना आदर्श मानून अराजकता पसरवण्याचे प्रकार घडतात, … Read more

भीषण आग आणि हाहाकार! ब्राह्मणदरा डोंगरावर जनावरांसह गुराख्याचा जळून मृत्यू

१९ मार्च २०२५, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावाजवळील ब्राह्मणदरा डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवंडी येथील रहिवासी सीताराम तुकाराम जाधव (वय ५३) हे मंगळवारी (१८ मार्च) जनावरे चारण्यासाठी ब्राह्मणदरा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! मेडिकल कॉलेज होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, राज्यात क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठ्या असलेल्या लोकसभेच्या नगर दक्षिण मतदार संघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यात हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली असून या महाविद्यालयासाठी जागेचा शोध घेण्यासंदर्भात समितीस सुचना … Read more

Stock Market Rally : एका दिवसात मोठी वाढ ! ह्या पाच शेअर्सची आज मार्केटमध्ये चर्चा

Stock Market Rally : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आज मोठी रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स ११३१ अंकांनी वाढून बंद झाला, तर निफ्टीने ३३७ अंकांची उसळी घेतली. विशेष म्हणजे निफ्टी बँक निर्देशांकाने ९६० अंकांची जोरदार वाढ नोंदवली. या बाजारातील चढउतारांमुळे काही निवडक शेअर्सनीही जबरदस्त कामगिरी केली. कालपर्यंत तोट्यात असलेले काही समभाग आज १५ ते … Read more

माजी खासदार डॉ. सुजय विखे राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येणार ?

Ahilyanagar Politics : आपल्या बेधकड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज राजकारण सोडून पुन्हा वैद्यकीय सेवेत येण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील गुरू पुण्यातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शैलेश पाटकर यांच्यासमोरच डॉ. विखे यांनी ही फटकेबाजी केली. डॉ. विखे न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे धडे डॉ. पाटकर यांनी दिले … Read more

Mauli Gavane Murder : श्रीगोंद्यात रक्ताने माखलेले सत्य ! अखेर पोलिसांनी पकडला माऊलीचा खून करणारा आरोपी

Mauli Gavane Murder : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती शेतातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने जलद गतीने तपास करून एका आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. १२ मार्च रोजी विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी … Read more

शिवनेरीतून गडांच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ खा. नीलेश लंके यांच्या मोहिमेस मोठा प्रतिसाद

एक दिवस शिवरायांच्या गड, कल्ले आणि दुर्गांसाठी या खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा रविवारी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेउन शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, खासदार नीलेश लंके यांच्या आवाहनानंतर या मोहिमेस शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. राज्यातील धार्मिकता, एकता, अखंडता बंधुत्वास कुठेतरी बाधा पोहचत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास … Read more

टंचाईच्या परीस्थीतीवर मात करण्याचे नियोजन – पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

विकास प्रक्रीये बरोबरच शंभर दिवसांच्या कामाचा उपक्रम म्हणून सर्व शासकीय कार्यालय स्वच्छता अभियान राबवावे,उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून जिल्हाधिकरी कार्यालय, जिल्हा परीषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने टंचाईच्या परीस्थीतीवर मात करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथील पालक मंत्री … Read more

निळवंडे धरणातून प्रवरा नदीत १७०० क्युसेक विसर्ग सुरू ! नागरिकांना काहीसा दिलासा…

Nilwande Water

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून सध्या १७०० क्युसेक वेगाने प्रवरा नदीत पाणी सोडले जात आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले असून या विसर्गामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठ्याला मदत होणार आहे. नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत १४ बंधारे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा भंडारदरा … Read more

Mauli Gavane Murder : माझ्या लेकराने असा काय गुन्हा केला होतो कि, त्याची निघृण हत्या केली ?

Mauli Gavane Murder News : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे – तुटलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पाच दिवसानंतर १५ मार्च रोजी पटली. दाणेवाडी गावातील दुसऱ्या – विहिरीत पोत्यात शरीराचे इतर – अवयव सापडले. ते अवयव माऊली सतीश गव्हाणे याचे आसल्याचा दुजोरा मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिला. परंतु बेलवंडी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. माऊलीच्या कानातील … Read more

माफीयाराजला पाठबळ.. ठेकेदारी पोसली..! संगमनेरात जुंपली, आ. खताळ यांनी आता थोरातांच सगळंच काढलं

Sangamner MLA Amol Khatal News

ठेकेदारी संस्‍कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्‍या प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. त्‍यांच्‍या प्रश्‍नांची उत्‍तर फक्‍त ठेकेदारी मध्‍येच गुंतलेली होती. वर्षानुवर्षे या तालुक्‍याचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्‍याला स्‍वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्‍वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्‍या बैठकीवर टिका करण्‍यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्‍मपरिक्षण करा, नव्‍या विकास प्रक्रीयेत … Read more

आमदार साहेब विखेंची गुलामी करण्यापेक्षा संगमनेरच्या हिताचा विचार करा

तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्ष संगमनेर तालुक्याला सांभाळलेले आहे, म्हणूनच महाराष्ट्राच्या विकसित तालुक्यांमध्ये संगमनेरची गणना होते. अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आ. अमोल खताळ यांनी आपण विखे यांना नाही तर संगमनेरकरांना बांधील आहोत याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने साधे नियोजन ज्यांना करता येत नाही, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर … Read more

लोकांचे प्रश्न, थेट कारवाई ! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनता दरबारात काय झाले ?

अहिल्यानगर येथे जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यांच्या तक्रारींवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान, जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी हजेरी लावून आपल्या विविध समस्यांची मांडणी केली. जनता दरबारात विविध सामाजिक, शासकीय आणि वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक अडचणी तसेच प्रशासनासमोरील … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘त्या’ मस्जिदजवळ ‘राडा’ ! थेट हत्याराने मारहाण

crime

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका मस्जिदजवळ ही घटना घडली. मस्जिदमध्ये चेष्टा मस्करी करु नका असे म्हटल्याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने तरुणास शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली. ही घटना मुकुंदनगर येथील गौसिया मस्जिदजवळ घडली. या बाबत नाजीम मोहंमदअली शेख (वय ३२, … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील तो मृतदेह माऊलीचाच ! वारकरी संप्रदायातील १९ वर्षीय युवकाचा निर्घृण कोणी केला ?

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून हा मृतदेह माऊली गव्हाणे ह्या तरुणाचाच असल्याची ओळख आईने दिलेल्या माहितीवरून झाली आहे. माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून त्याचे शरीर तुकडे-तुकडे करण्यात आले असून. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : 1600 फूट खोल सापडला तरुणाचा मृतदेह ! मित्रांनी सांगितलं तो…

Ahilyanagar Breaking News : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या कोकण खड्यावरून जवळपास 1600 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूमागे घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम संभाजीनगरमधील रहिवासी असलेल्या ऋषिकेशचा नाशिक येथे शिक्षण सुरू होता. सोमवारी (दि.10) … Read more

पालकमंत्र्यांची अवस्था, नाचता येईना अंगण वाकडे अशी !

vikhe and thorat

Ahilyanagar Politics : संगमनेर तालुक्यात खंडणीचे उद्योग सुरू झाले आहेत, काम बंद पाडून लोकांना फोन जात आहेत, हे कोणाच्या आशीर्वादाने? भूसंपादनासाठी निधी वितरित झालेला असतानाही नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आत्ताच निर्माण होण्याचे कारण काय? अचानक नवीन मार्ग शोधण्याचे कारण काय? वीज पुरवठा सुरळीत होत नाही, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, त्याचे उत्तर काय? संगमनेर शेजारील … Read more

दोन बिबटे दूध डेअरीमध्ये शिरले अन दरवाजे लॉक झाले.. अहिल्यानगरमधील ‘या’ गावात तासभर थरार

Ahilyanagar News : बिबट्यांचा धुमाकूळ अहिल्यानगर मधील अनेक तालुक्यांत वाढत चालला आहे. राहुरी तालुक्यातील शेतकरी बिबट्यांनी फाडल्याची घटना ताजी असताना आता राहाता मधील घटना समोर आली आहे. दोन मोठे बिबटे दूध डेअरीत शिरले, त्यानंतर दरवाजे लॉक झाले, त्यानंतर बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. राहता येथील येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असणाऱ्या एका डेअरी प्रोडक्ट्सच्या प्रांगणात … Read more